Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » इस्रोच्या मंगळ पथकाला अमेरिकेचा पुरस्कार

इस्रोच्या मंगळ पथकाला अमेरिकेचा पुरस्कार

Mars-Orbiter-Mission-MOM-ISROचेन्नई, [१३ जानेवारी] – अगदी पहिल्या प्रयत्नात भारताची मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या ‘मंगळ’ पथकाला अमेरिकेच्या ‘नासा’कडून यंदाचा ‘अंतराळ पायोनियर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
इस्रोने चेन्नईतील आपल्या केंद्रातून याबाबतची माहिती एका पत्रकाद्वारे दिली. यात म्हटले आहे की, नासाने या वर्षीचा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील अंतराळ पायोनियर पुरस्कार भारतीय मंगळ मोहीम यशस्वी करणार्‍या इस्रोच्या पथकाला जाहीर केला आहे. इस्रोच्या या पथकाला हा पुरस्कार टोरांटो येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत देण्यात येणार आहे. याच वर्षीच्या मे महिन्यात ही परिषद होणार आहे.
तब्बल ३०० दिवसांच्या प्रवासानंतर इस्रोने गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी आपली मंगळ यान मोहीम अगदी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखविली होती. हे यश संपादन करणारा भारत हा पहिलाच देश आहे. मंगळ ग्रहाच्या विविध छटा टिपण्यासाठी इस्रोने उच्च दर्जाचा कॅमेराही पाठविला आहे. त्यामुळे मंगळाचा अभ्यास करण्यात बरीच मदत होत आहे. भारताच्या या मोहिमेचे जगभरात कौतुक करण्यात आले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19664

Posted by on Jan 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (2246 of 2453 articles)


पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या उलट्या बोंबा तालिबानशी संबंध असल्याचा जावईशोध इस्लामाबाद, [१३ जानेवारी] - येनकेन प्रकारे भारताला अस्थिर करण्यासाठी सातत्याने ...

×