Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ईपीएफमधून पैसे काढताना कर नाही : जेटली

ईपीएफमधून पैसे काढताना कर नाही : जेटली

Arun Jaitley9नवी दिल्ली, [८ मार्च] – विविध संघटनांचा दबाव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफवर कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी संसदेत केली.
अर्थसंकल्प सादर करताना जेटली यांनी ईपीएफ काढताना त्यातील ६० टक्के रकमेवर कर लावण्याची घोषणा केली होती. या घोषणेला विविध राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला होता. याबाबत मिळालेल्या विविध प्रस्तावांचा सखोल अभ्यास केल्यानंतर ईपीएफवर कर लावण्याचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ईपीएफमधून काढण्यात येणार्‍या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. पूर्वीप्रमाणेच ही रक्कम काढता येणार आहे. मात्र ईपीएफच्या ६० टक्के रकमेवर मिळणार्‍या व्याजावर कर द्यावा लागणार आहे. तथापि, यातून १५ हजार पर्यंतच्या मासिक उत्पन्नवाल्यांना वगळण्यात आले आहे.
कर्मचार्‍यांनी पेन्शन फंडमध्ये पैसे गुंतविण्याचे आवाहनही जेटली यांनी केले आहे. आता पेन्शन फंडमधून काढण्यात येणार्‍या ४० टक्के रकमेवर कोणताही कर लागणार नाही. खाजगी कंपन्यांचे कर्मचारी पेन्शन फंडमध्ये ६० टक्के रक्कम कायम ठेवतील आणि त्यातूनच त्यांना नियमितपणे पेन्शन मिळेल. कर्मचार्‍यांनी आपली ६० टक्के राशी वार्षिक निधीत गुंतवल्यावरच त्यांना करमाफीची सवलत मिळू शकणार आहे. आधी पेन्शन फंडमधून पैसे काढण्यावर १०० टक्के कराची तरतूद होती. वार्षिक निधीत गुंतवणूक केल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याचे निधन झाले, तर त्यांच्या कुटुंबाला मिळणारी राशी करमुक्त ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ईपीएफवर कर लावण्याच्या घोषणेचा फटका देशातील ५० ते ६० लाख कर्मचार्‍यांना बसणार होता. त्यामुळे या निर्णयाला सर्वस्तरातून जोरदार विरोध झाला. यावर पंतप्रधान कार्यालयाची बारीक नजर होती. दबावामुळे पंतप्रधान कार्यालयाने हा निर्णय मागे घेण्याची सूचना अर्थमंत्रालयाला केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27142

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (726 of 2453 articles)


=सहकार्य करण्याचे विरोधकांचे आश्‍वासन= मुंबई, [८ मार्च] - सरकारने राज्यात डान्सबारबाबत पुन्हा नव्याने कायदा सभागृहात आणावा. आम्ही दोन्ही सभागृहात सहकार्य ...

×