Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ईपीएफवरील ‘तो’ कर रद्द होणार?

ईपीएफवरील ‘तो’ कर रद्द होणार?

=फेरविचार करण्याची पंतप्रधानांची सूचना=
EPFO-Indiaनवी दिल्ली, [५ मार्च] – कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमधील (ईपीएफ) काही पैसा काढण्याची मुभा देतानाच त्यावर कर आकारण्याच्या अर्थसंकल्पातील प्रस्तावावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये हस्तक्षेप केल्याचे वृत्त असून, त्यामुळे हा कर रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.
अर्थसंकल्पातील या प्रस्तावावर फेरविचार करावा, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना केल्याचे सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे हा प्रस्तावित कर लवकरच मागे घेतला जाण्याची शक्यता असून, तशी घोषणा लोकसभेत होऊ शकते.
ईपीएफमधून पैसा काढल्यास त्यावर कर लावण्याचा प्रस्ताव अरुण जेटली यांनी २९ फेबुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात सादर केला आहे. परंतु, या प्रस्तावावर देशभरातून नाराजीचा सूर उमटला. पीपीएफला या प्रस्तावाच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले असल्याचे सरकारकडून नंतर स्पष्ट करण्यात आल्यानंतरही ही नाराजी कमी झालेली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27030

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (764 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ मार्च] - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कराची येथे २०१७ मध्ये होणार्‍या साहित्य महोत्सवात हजेरी लावणार आहेत. ...

×