Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ईपीएफवर ९ टक्के व्याज?

ईपीएफवर ९ टक्के व्याज?

EPFO-Indiaनवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ २०१५-१६ या वर्षासाठी, नऊ टक्के व्याजदर देण्याची शक्यता आहे. येत्या १६ फेब्रुवारीला व्याजदराशी संबंधित घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून ईपीएफओ ८.७५ टक्के व्याजदर देत आहे.
संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, टीबीटी अर्थात केंद्रीय मंडळाची बैठक येत्या १६ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. या बैठकीत ईपीएफओच्या ठेवीदारांना द्यावयाच्या व्याजाविषयीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधीही व्याजदरात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. ठेवींवर नऊ टक्के व्याज दिल्यास संघटनेच्या तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26731

Posted by on Feb 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (859 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [५ फेब्रुवारी] - भीतीविरुद्ध सर्वधर्मीय नागरिक एकत्र आले तर त्यामुळे निर्माण होणार्‍या शक्तिविषयी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ...

×