Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ईपीएस लाभार्थ्यांना ७५०० रुपये निवृत्तीवेतन द्या

ईपीएस लाभार्थ्यांना ७५०० रुपये निवृत्तीवेतन द्या

=प्रकाश येन्डे यांची मागणी, संसदेसमोर आंदोलनाचा इशारा=
epfo1नवी दिल्ली, [१९ एप्रिल] – ईपीएस-९५ च्या लाभार्थ्यांना ७५०० रुपये निवृत्तीवेतन आणि त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी एम्प्लॉईज पेन्शन स्कीम १९९५ च्या राष्ट्रीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येन्डे यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत केली.
यासाठी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, कायद्यात अशी दुरुस्ती होईपर्यंत भगतसिंह कोशियारी समितीने केलेल्या शिफारशी अंतरिम स्वरुपात लागू करण्यात याव्या, अशी मागणी करत प्रकाश येन्डे म्हणाले की, जे कर्मचारी १९९५ च्या आधी निवृत्त झाले, त्यांना ईपीएस १९९५ च्या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यांनाही दरमहा ५ हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याची घोषणा करण्यात यावी. याशिवाय ईपीएस निवृत्तीवेतनधारकांसाठी कामगार राज्य विमा रुग्णालयात नि:शुल्क उपचाराची व्यवस्था करण्यात यावी.
ईपीएस योजनेत १५ कोटी सदस्य असून यात निवृत्तीवेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या फक्त ५१ लाख आहे, याकडे लक्ष वेधत येन्डे म्हणाले की, यातील ३० लाख सदस्यांना किमान एक हजार आणि कमाल २३०० रुपये निवृत्तीवेतन या योजनेंतर्गत देण्यात येत आहे. ही कर्मचार्‍यांची आणि त्यांच्या कुटुंबाची एकप्रकारे थट्टाच आहे.
भगतसिंह कोशियारी समितीने या योजनेंतर्गत ३ हजार रुपये निवृत्तीवेतन आणि त्यावर महागाई भत्ता देण्याची शिफारस आपल्या अहवालातून केली होती, असे स्पष्ट करत येन्डे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी कॉंग्रेसने या निवृत्तीवेतनात वाढ करत ती एक हजार रुपये करण्याची घोषणा केली होती. पण कॉंग्रेस निवडणूक हरली. त्यामुळे केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने हे निवृत्तीवेतन एक हजार रुपये तर केले, पण आजही लाखो लोकांना एक हजार रुपयोपेक्षाही कमीच निवृत्तीवेतन मिळते. यातील विसंगती अशी की, जिवंत असलेल्या कर्मचार्‍याला ७०० रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते. मात्र, त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या विधवा पत्नीला एक हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते. ही थट्टा बंद करण्यात यावी आणि पती व पत्नीला सन्मानाने जीवन जगता येईल, एवढे निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे.
विशेष म्हणजे ईपीएस-९५ च्या लाभार्थ्यांना ७५०० रुपये निवृत्तीवेतन आणि त्यावर महागाई भत्ता दिला तरी सरकारी तिजोरीवर त्याचा कोणताही भूर्दंड पडणार नाही. कारण, सरकारकडे आज या कर्मचार्‍यांचे २ लाख ३८ हजार ५३१ कोटी ८४ लाख शिल्लक आहेत, याशिवाय दर महिन्यात या योजनेत १५ कोटी कर्मचार्‍यांचे १२ हजार कोटी म्हणजे एक वर्षात १ लाख ४४ हजार कोटी रुपये जमा होतात, याकडे येन्डे यांनी लक्ष वेधले.
सरकारने आमच्या न्याय मागण्यांची दखल घेतली नाही तर ७ डिसेंबर २०१६ ला दिल्लीत संसदभवनासमोर ५ लाख निवृत्त कर्मचारी धरणे देतील, असा इशारा प्रकाश येन्डे यांनी दिला. सरकारने आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नये, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला सचिव पुंडलिक पांडे, सहसचिव मोहम्मद युनुस आणि उत्तरप्रदेशचे समन्वयक ब्रम्हप्रकाश बालियत उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27916

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (461 of 2453 articles)


=उच्चशिक्षणासाठीही मिळणार पीएफ= नवी दिल्ली, [१९ एप्रिल] - भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याबाबतच्या नव्या नियमांमुळे नोकरदार वर्गाचा रोष ओढविल्यानंतर केंद्र ...

×