Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ईव्हीएममध्ये ‘नोटा’लाही मिळाले चिन्ह

ईव्हीएममध्ये ‘नोटा’लाही मिळाले चिन्ह

=निवडणूक आयोगाचा पुढाकार=
evmनवी दिल्ली, [१९ सप्टेंबर] – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेत ज्याप्रमाणे राजकीय पक्षांचे उमेदवार आणि निवडणूक चिन्ह असते, त्याचप्रमाणे नकाराधिकाराचा वापर करणार्‍या मतदारांनाही आता ‘नन ऑफ धिस अबाव्ह’ अर्थात ‘नोटा’च्या पर्यायासमोर विशिष्ट चिन्ह दिसणार आहे.
निवडणूक आयोगाने ईव्हीएमवर गेल्या वर्षीपासून ‘नोटा’ या पर्यायाचा समावेश केला आहे. ‘नोटा’च्या समोर आता ‘काळ्या रंगाची फुली’ हे चिन्ह दिसणार आहे. पुढील महिन्यात बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपासून या चिन्हाचा वापर सुरू होणार आहे.
अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनने निवडणूक आयोगासाठी हे चिन्ह तयार केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आयोगाने ‘नोटा’चा पर्याय ईव्हीएममध्ये सर्वात शेवटी सादर केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६० लाख मतदारांनी या पर्यायाचा वापर केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23913

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1442 of 2453 articles)


=नेताजींच्या फाईल्सबाबत नायडू यांचे मत= हैदराबाद, [१९ सप्टेंबर] - पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक ...

×