Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ईशान्य भारत हा भारताचा अविभाज्य भाग!

ईशान्य भारत हा भारताचा अविभाज्य भाग!

=भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे प्रतिपादन=
Amit_Shahनवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] – ईशान्य भारत हा भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि यात रा. स्व. संघाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.
नागालॅण्डमध्ये गांधी आश्रमाची स्थापना करून स्थानिक जनतेत देशप्रेमाची भावना रुजवणारे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते नटवरभाई ठक्कर यांना मायहोम इंडिया या संस्थेतर्फे कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शाह बोलत होते. मावळणकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह उपस्थित होते.
संघपरिवारातील अनेक संस्था, रामकृष्ण मिशन आणि नटवरभाई ठक्कर यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी काम केल्यामुळेच ईशान्य भारत आपल्या देशाचे तेजस्वी अंग बनले आहे, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली, एवढेच नाही तर ईशान्य भारतातील राज्यांना सढळ हाताने निधी दिला, त्या भागात विकासाचे अनेक कार्यक्रम राबवले, असे शाह म्हणाले. त्यामुळेच ईशान्य भारताचे उर्वरित भारताशी सांस्कृतिक नाते नाही, हा अनेक वर्षांपासूनचा गैरसमज दूर झाला. नटवरभाई आणि अन्य अनेकांनी केलेल्या त्यागामुळे हे नाते अधिकच दृढ झाले, असे शाह यांनी सांगितले. माय होम इंडियाच्या कार्याची शाह यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर ईशान्य भारताच्या विकासाला गती मिळाली, पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेवरुन दर १५ दिवसात आठ मंत्री ईशान्य भारताचा प्रवास करत आहे, असे डॉ. जितेंद्रसिंह यांनी सांगितले. छोट्याछोट्या गोष्टींसाठी दिल्लीला होणारे हेलपाटे थांबवण्यासाठी आम्ही प्रशासनच ईशान्य भारतातील लोकांच्या दारात नेले, सरकारी अधिकार्‍यांच्या बैठका या भागातील विविध राज्यांत सुरू केल्या, सेंद्रिय शेतीसाठी १२० कोटी रुपयांची तरतूद केली, असे डॉ. जितेंद्रसिंह यांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देता आले नाही. पण आता किमान देश अखंड ठेवण्याच्या कामात योगदान देता यावे, म्हणून नागालॅण्डमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला, असे सत्काराला उत्तर देताना नटवरभाई ठक्कर यांनी सांगितले. देश स्वतंत्र झाल्यावर फिजो यांनी स्वतंत्र नागालॅण्डचा नारा दिला होता. याची लागण वेगाने ईशान्य भारतातील अन्य राज्यांनाही झाली. सीमावासीयांमध्ये देश आणि देशवासीयांबद्दल आत्मियता निर्माण झाल्याशिवाय देशाच्या सीमा मजबूत होऊ शकणार नाहीत, याकडे ठक्कर यांनी लक्ष वेधले.
देशाचा इतिहास एका घराण्यापुरताच मर्यादित ठेवल्यामुळे ईशान्य भारतात ब्रिटिशांविरोधात लढा देणार्‍या रानी मॉं गायडीनल्यू, किएंग नांगबा, तीरथसिंह आदी स्वातंत्र्ययोद्ध्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून जनतेसमोर आला नाही, मात्र केंद्रात मोदींचे सरकार आल्यापासून परिस्थिती बदलली आहे, असे प्रास्ताविकात माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23829

Posted by on Sep 17 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1466 of 2453 articles)


=आंध्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल= विजयवाडा, [१६ सप्टेंबर] - अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या नद्या जोडणी अभियानांतर्गत ऐतिहासिक पाऊल ...

×