Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » उच्च शिक्षण संस्थांमधून आरक्षण हद्दपार व्हावे

उच्च शिक्षण संस्थांमधून आरक्षण हद्दपार व्हावे

  • सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश

supreme_court_1नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधून सर्वच प्रकारचे आरक्षण कायमचे हद्दपार करण्याची गरज आहे. देशाचे व्यापक हित जोपासण्यासाठी केंद्र सरकारला काही ठोस पावले उचलावीच लागणार आहेत, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षांचा कालावधी लोटला असतानाही काही सुविधा अजूनही कायमच आहेत, यावर खेद व्यक्त करून, केंद्र सरकारने आता निष्पक्ष होऊनच ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे न्या. दीपक मिश्रा आणि न्या. पी. सी. पंत यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने म्हटले आहे. मंगळवारी या प्रकरणी दाखल जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिले.
सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमात गुणवत्तेच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश वारंवार देण्यात आले असतानाही, केंद्र आणि राज्य सरकारांनी त्याचे पालन केले नाही. अशा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांमध्ये योग्यतेपेक्षाही आरक्षणाचा विचार केला जातो, हे देशाचे दुर्दैवच आहे, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
१९८८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निकालाशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांमधील प्रवेशाबाबत त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की, उच्च शिक्षणाचा स्तर सुधारणे देशहिताचेच कार्य असल्याने देशातील कोणत्याही उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाला वाव असायलाच नको. ज्यावेळी सुपर स्पेशालिटीसारख्या अभ्यासक्रमांमधून आरक्षण कायमचे हद्दपार होईल, त्यानंतरच देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवाही प्राप्त होतील. देशहितासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमच्या या मतावर गंभीरपणे विचार करतील आणि उच्च शिक्षणातून आरक्षणाची प्रथा नष्ट करतील, असा विश्‍वासही व्यक्त केला होता.
या २७ वर्षे जुन्या निकालाचा हवाला देत, न्यायालयाने म्हटले की, आम्ही आताही केंद्र आणि राज्यांना हाच संदेश देऊ इच्छित आहोत. गुणवत्ता असतानाही आरक्षणामुळे वंचित राहाणार्‍या समाजातील मोठ्या वर्गाच्या भावना आम्ही सरकारपुढे सादर करीत आहोत. त्यामुळे सरकारने देशहिताला प्राधान्य देऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25376

Posted by on Oct 29 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1265 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] - दाऊद इब्राहिमला घाबरून आपण बाली पोलिसांना शरण गेलो, या वृत्ताचे सध्या इंडोनेशियन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ...

×