Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार येणार

उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार येणार

=अमित शाह यांचा विश्‍वास=
Amit_Shah_Haryana_rallyलखनौ, [२५ फेब्रुवारी] – पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज गुरुवारी व्यक्त केला.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल असा विश्‍वास असल्याचे अमित शहा यांनी भाजपाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रदेश कार्यालयाचे उद्‌घाटन केल्यानंतर बोलताना सांगितले.
आपण राजकारणाबाबत फारसे बोलणार नसलो तरी राष्ट्रवादाची चर्चा अवश्य करणार. जेएनयू परिसरात करण्यात आलेली राष्ट्रविरोधी घोषणाबाजी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, असा माझा कॉंग्रेसला आणि विशेष करून राहुल गांधी यांना प्रश्‍न आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाची नेमकी विचारधारा स्पष्ट करावी, अशी मागणीही शाह यांनी केली. गेल्या सहा दिवसांपासून आपण हा प्रश्‍न उपस्थित करत आहोत. परंतु, राहुल गांधी यांनी मौन धारण केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
लोकशाहीमध्ये अशा घोषणाबाजीचे मुळीच समर्थन करता येणार नाही, असे सांगतानाच भाजपा कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन हा मुद्दा उपस्थित करावा, असे आवाहनही त्यांनी केले. अशा कारवायांमध्ये लिप्त असलेल्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शाह यांनी दिला.
राहुल गांधी व्होटबँकेच्या राजकारणासाठी देशविघातक शक्तींना पाठिंबा देत आहेत, असा आरोप अमित शाह यांनी बुधवारी बहराईच येथे बोलताना केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26888

Posted by on Feb 25 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (811 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२५ फेब्रुवारी] - इराक व सीरियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केल्यानंतर जगाच्या अनेक भागात धुमाकूळ घालणार्‍या इस्लामिक स्टेट ऑफ ...

×