Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » उत्तरप्रदेशात भाजपा स्वबळावर लढणार

उत्तरप्रदेशात भाजपा स्वबळावर लढणार

=नकवी यांची माहिती=
mukhtar-abbas-naqvi01बरेली, [२ जानेवारी] – उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसून, ही निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज शनिवारी येथे दिली.
२०१७ मध्ये या राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. विद्यमान समाजवादी पार्टीच्या सत्ताकाळात जातीय दंगली आणि हत्यांचे सत्र झाले. बसपावरही नागरिकांचा आता विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे राज्यातील नागरिक भाजपाकडेच अपेक्षेने पाहात आहे. लोकसभा निवडणुकीत आमचे ७२ खासदार निवडून आले. विधानसभा निवडणूकही आम्ही स्वबळावर लढणार आणि स्पष्ट बहुमतासह सत्तेवर येणार असल्याचा विश्‍वासही नकवी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. नकवी येथे एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना, अरुण जेटली हे प्रामाणिक व्यक्ती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी जेटली यांच्यावर खोटे आरोप ठेवणार्‍या आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि या मुद्यावरून संसदेतील कामकाजाची कोंडी करणार्‍या कॉंग्रेसवरही प्रखर टीका केली. लोककल्याण कार्यात सहभागी होण्याची या दोन्ही पक्षांची इच्छा नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26375

Posted by on Jan 3 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (950 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२ जानेवारी] - भारतातील तुरूंगातून पाकचे १८९ कैदी हरविल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यात मासेमारांसह पाकमधील नागरिकांचाही समावेश ...

×