Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

=अमित शाह राज्यातील भाजपा नेत्यांना भेटले=
amit-shah-7नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपा सज्ज झाला असून, निवडणूक व्यूहरचना ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची भेट घेतली.
राज्यात पक्षासमोरील आव्हानांवर विचारविमर्ष सुरू असून, पार्टीने अद्याप प्रदेशाध्यक्षांचे नाव जाहीर केलेले नाही. यासाठी अनेक मुद्यांवर त्यांनी पक्षातील नेत्यांशी बैठकीत चर्चा केली. डिसेंबरमध्ये प्रदेशाध्यक्षाचा कार्यकाळ संपलेल्या लक्ष्मीकांत वाजपेयी आणि ओमप्रकाश माथुर यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यातील नेत्यांशीही शाह चर्चा करणार आहेत. पंजाबमधील पक्ष नेत्यांची त्यांनी शनिवारी भेट घेतली. येत्या काही दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झाले होते आणि केंद्रात बहुमताची सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यामुळेच हे राज्य भाजपाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26773

Posted by on Feb 8 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (847 of 2452 articles)


चौथर्‍यावर येऊन पूजा करण्यावर बंदी महिला पुजार्‍याचीही नियुक्ती करणार श्री श्री रविशंकर यांची माहिती नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] - ...

×