Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » उद्यापासून कर्जदर निश्‍चितीचे नवे सूत्र

उद्यापासून कर्जदर निश्‍चितीचे नवे सूत्र

RBI GATEमुंबई, [३० मार्च] – सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आपापल्या परीने कर्जावरील व्याजदर ठरवित असल्याने, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचे दर निश्‍चित करण्यासाठी सर्व बँकांसाठी नवे सूत्र तयार केले असून, त्याची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्ष अर्थात येत्या १ एप्रिलपासून होणार आहे.
या नव्या सूत्रानुसार सर्व बँकांना त्यांना मिळणार्‍या निधीच्या किमान शुल्कानुसार (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग) कर्जाचे दर निश्‍चित करावे लागणार आहे. हे कर्जदर आगामी तीन वर्षांकरिता निश्‍चित केले जाणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दराशी बँकांच्या ठेवीचे दर संलग्न असतील. त्यामुळे पतधोरणाचा आढावा घेताना रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात केल्यास त्याचा थेट आणि तातडीने लाभ कर्जदारांना लाभ मिळणार आहे. मात्र तीन वर्षांपेक्षा जास्तीच्या निश्‍चित व्याजदर लागू असणार्‍या कर्जासाठी हा नियम लागू होणार नसल्याचे अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. दीर्घ मुदतीचे कर्ज बहुदा उद्योगपती आणि व्यावसायिक घेत असल्याने बँकांना पूर्वीपेक्षा कमी लाभ व उद्योगांना फायदा होण्याची शक्यता आहे, असे अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27651

Posted by on Mar 31 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (546 of 2453 articles)


=जेटलींचे ऑस्ट्रेलियन व्यावसायिकांना आवाहन= सिडनी, [३० मार्च] - मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सहभागी होण्याचे ...

×