Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » उद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर

उद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर

sun-earthअमरावती, [२ जुलै] – पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार होणार असल्याने ४ जुलै रोजी पृथ्वी ही सूर्यापासून सर्वात दूर राहणार आहे. पृथ्वी ते सूर्य हे अंतर सरासरी १५२ दशलक्ष किमी राहणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
दरवर्षी ४ जुलै रोजी पृथ्वी व सूर्यामधील अंतर हे सर्वात जास्त असते. या घटनेला खगोलशास्त्रात एपीहेलिऑन (अपसूर्य) असे म्हणतात. पृथ्वी व सूर्याचे अंतर हे सरासरी १५ कोटी किलोमीटर आहे. या अंतराला खगोलशास्त्रात एक खगोलीय एकक असे म्हणतात. दरवर्षाला या दिवशी अंतरात थोडा फरक पडू शकतो. सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून तो हायड्रोजनपासून हेलियम बनविण्याची क्रिया अहोरात्र करतो. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम बनते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रूपांतर सौर ऊर्जेमध्ये होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी राहते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध १८४३ मध्ये श्‍वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमीटरने आकर्षली जात आहे. पाच खंड सुद्धा हळूहळू सरकत आहे. त्यामुळे न्यूयार्क शहर हे लंडनपासून दरवर्षाला २.५ से.मी. दूर जात आहे. सूर्यावरून कधीकधी चुंबकीय लहरी फेकल्या जातात. त्यामुळे चुंबकीय वादळे येतात. १८५९ मध्ये हे वादळ आले होते. या वादळाला केरिग्टन इर्व्हेट असे नाव दिले होते. याचा सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होणार नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29018

Posted by on Jul 3 2016. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (162 of 2466 articles)


नवी दिल्ली, [२९, जून] - केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या ...

×