Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » उद्योग, पायाभूत क्षेत्राची बदनामी करू नका

उद्योग, पायाभूत क्षेत्राची बदनामी करू नका

=जेटलींचा विरोधकांना टोला=
arun jaitley8नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – सरकारच्या सुधारित भू-संपादन विधेयकाचे आज गुरुवारी राज्यसभेत जोरदार समर्थन करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. उद्योग आणि पायाभूत क्षेत्राची बदनामी होईल, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, असा स्पष्ट इशाराही जेटली यांनी दिला.
संसदेत भू-संपादन विधेयकावरून विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यानंतर या विधेयकाचे समर्थन करताना जेटली अतिशय आक्रमक झाले होते. प्रस्तावित विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचे असतानाही कॉंगे्रससह काही राजकीय पक्ष या विधेयकाला शेतकरीविरोधी संबोधून उद्योग क्षेत्राला बदनाम करीत आहेत. या मुद्यावर सध्या सुरू असलेली चर्चा गरीब आणि श्रीमंत किंवा शेतकरी व गैरशेतकरी अशी नसून, देशवासीयांना दारिद्र्याच्या गडद खाईतून बाहेर काढण्यासाठीची आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
पूर्वीच्या संपुआ सरकारने या संदर्भात तयार केलेल्या कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करून, शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योग आणि पायाभूत क्षेत्रालाही मिळाव्यात यासाठी भाजपाप्रणीत रालोआ सरकारने अध्यादेशाचा पर्याय निवडला. संरक्षण क्षेत्रासह पाच वर्गवारीतील प्रकल्पांकरिता जर जमिनी संपादित करायच्या असतील, तर ८० टक्के जमीन मालकांची मंजुरी घेणे आवश्यक करणारी अट यात शिथिल करण्यात आली आहे. सोबतच, अशा प्रकल्पांच्या सामाजिक परिणामांवरील अभ्यास हाताळण्याची गरजही संपुष्टात आणण्यात आली आहे. ही तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती. यामुळे संरक्षणासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षांचा कालावधी लागायचा, असे जेटली यावेळी म्हणाले.
सरकारने जारी केलेला अध्यादेश हा तात्पुरता मार्ग आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतैक्याने हे विधेयक मंजूर व्हावे, असेच सरकारला वाटते. याच अधिवेशनात जर ते पारित झाले नाही, तर अध्यादेश बारगळेल. लोकसभेत सरकार पूर्ण बहुमतात आहे. मात्र, राज्यसभेत सरकारला विरोधकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे, असे जेटली यांनी सांगितले. यावेळी केलेल्या आपल्या आवेशपूर्ण भाषणात जेटली यांनी कॉंग्रेससह तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्यांचा खरपूस समाचार घेतला. संपुआ सरकारच्या कार्यकाळात उद्योग व वाणिज्य मंत्री असलेले आनंद शर्मा यांनी याबाबत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना लिहिलेले पत्रच जेटली यांनी सभागृहात सादर केले. देशातील इतर सर्व राज्यांची वित्तीय तूट संपुष्टात आली असताना पश्‍चिम बंगाल आणि केरळ ही दोन राज्ये अजूनही मागेच आहेत. तुमच्या ध्येयधोरणांचाच हा परिणाम आहे. तुमची ध्येयधोरणे देशभरात लागू केली तर संपूर्ण देशाच आर्थिक दिवाळखोरीत निघेल, असा टोला जेटली यांनी डाव्या पक्षांना लगावला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20896

Posted by on Feb 27 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2008 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [२६ फेब्रुवारी] - टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी क्षेत्रात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली ...

×