Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » उमर, अनिर्बानला अंतरिम जामीन

उमर, अनिर्बानला अंतरिम जामीन

LAWनवी दिल्ली, [१८ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या ९ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात देशद्रोही घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा खटला दाखल असलेले उमर खलिद व अनिर्बन भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांना येथील सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
पतियाळा हाऊस संकुलातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश रीतेश सिंह यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या व्यक्तिगत हमीवर जामीन दिला. यासंदर्भातील औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खलिद व भट्टाचार्यची तिहार कारागृहातून सायंकाळी सुटका करण्यात आली.
याच प्रकरणात सहआरोपी असलेल्या कन्हैय्या कुमारला नुकत्याच मिळालेल्या जामिनाच्या धर्तीवर आम्हालाही जामीन देण्यात यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27433

Posted by on Mar 19 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (621 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१८ मार्च] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वातील पर्यावरण मंत्रालयाने पुढाकार ...

×