Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » उर्वरित नऊ जवानांचे पार्थिव बेस कॅम्पला आणले

उर्वरित नऊ जवानांचे पार्थिव बेस कॅम्पला आणले

=सियाचीन दुर्घटना=
siachensoldierजम्मू, [१३ फेब्रुवारी] – सियाचीन ग्लेशियर येथे महाकाय हिमकडे कोसळल्याने त्याखाली दबून वीरमरण आलेल्या लष्करातील उर्वरित नऊ जवानांचे पार्थिव आज शनिवारी लडाख सेक्टरमधील सियाचीनच्या बेस कॅम्प येथे आणण्यात आले. तथापि, हवामान खराब असल्याने सर्व पार्थिव हेलिकॉप्टरने लेहला नेण्याच्या मार्गात अडचणी जात आहेत.
गेल्या आठवड्यातील या भीषण घटनेत लान्स नायक हनुमंतप्पा हा एकमेव जवान सहा दिवस २५ फूट बर्फाच्या खाली उणे ५० अंशाच्या कडाक्याच्या थंडीतही जिवंत होता. तथापि, लष्करी रुग्णालयात तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हनुमंतप्पा यांची प्राणज्योत मालवली होती. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर कर्नाटकातील त्यांच्या जन्मगावी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
त्यांच्यासोबत हिमकड्याखाली गाडल्या गेलेल्या उर्वरित नऊ जवानांचेही पार्थिव बाहेर काढण्यात आले असून, आज सकाळी ते सियाचीनमधील लष्कराच्या बेस कॅम्प येथे आणण्यात आले आहेत. लेहपर्यंतचा पुढील प्रवास खराब हवामानामुळे थांबविण्यात आला आहे. हवामान उद्या रविवारपर्यंत स्वच्छ होईल, असे भाकित वेधशाळेनेही केले असल्याची माहिती लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. सुभेदार नागेश टी.टी., हवालदार एलुमलाई एम., लान्स हवालदार एस. कुमार, लान्स नायक सुधीश, हवालदार महेश पी. एन., हवालदार गणे, रामा मूर्ती, मुश्ताक अहमद आणि महाराष्ट्राच्या सातार्‍यातील एस. व्ही. सूर्यवंशी अशी या वीरमरण आलेल्या जवानांची नावे आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26827

Posted by on Feb 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (830 of 2453 articles)


=डेव्हिड हेडलीच्या कबुलीजबाबाने खळबळ= मुंबई, [११ फेब्रुवारी] - गुजरातमध्ये २००४ साली पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहां ही युवती दहशतवादीच ...

×