Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

►अर्थसंकल्पातील प्रस्ताव,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –
जे करदाते प्रथमच आयकर विवरण भरणार आहेत, त्यांना एक वर्षपर्यंत छाननीतून सवलत दिली जाणार आहे. पण, त्यांनी वेळेत आपले विवरण सादर करणे आवश्यक आहे. कारण, विवरण भरण्यास उशीर करणार्‍यांना आर्थिक दंड भरावा लागणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यात आयकर भरणार्‍यांची संख्या फार कमी असल्याचे दिसून आले असून, यामुळे इतर करदात्यांवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे नव्या करदात्यांना आयकर विवरण भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात उपरोक्त घोषणा केली आहे.
आयकर विवरण जमा करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जर ते भरण्यात आल्यास त्यावर पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच ३१ डिसेंबरनंतर आयकर विवरण भरल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
तथापि, ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना १ हजार रुपये दंड बसणार आहे, असे अर्थसंकल्पात नमूद आहे.
अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री म्हणाले की, देशाच्या सकल  राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत देशात कर जमा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. असंघटित क्षेत्रातील ४.२ कोटी लोक आहेत, यातील १.७४ लोक आयकर विवरण भरतात. तर लघु उद्योग करणार्‍यांची संख्या ५.६ कोटी आहे आणि त्यातील १.८१ कोटी लोक आयकर विवरण भरतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29401

Posted by on Feb 3 2017. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (70 of 2453 articles)


►केवळ ५४ जागांवर समाधान माना ►युती तुटण्याच्या मार्गावर, वृत्तसंस्था लखनौ, २० जानेवारी - राष्ट्रीय लोकदलाशी कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर ...

×