Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » उ कोरियात अणुबॉम्ब चाचणीमुळे भूकंप

उ कोरियात अणुबॉम्ब चाचणीमुळे भूकंप

north-korea-jongसेऊल, [६ जानेवारी] – उत्तर कोरियातील अणुबॉम्ब चाचणी केंद्राजवळ आज बुधवारी विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वीपणे करण्यात आली. मात्र ज्या भागात ही चाचणी करण्यात आली त्याठिकाणी हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटामुळे भूकंप झाल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेच्या भौगोलिक सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी दहा वाजता उत्तर कोरियातील अणुबॉम्ब केंद्राजवळ ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याचे स्पष्ट केले. या भूकंपानंतर दक्षिण कोरियाने हा कृत्रिम भूकंपाचा धक्का असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाने पंगेयेरी येथील केंद्रावर हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली असून त्या ठिकाणापासून अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला.त्यामुळे ही अणुबॉम्ब चाचणी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ही शंका जर खरी ठरली तर उत्तर कोरियाची ही तिसरी आण्विक चाचणी असेल. या भूकंपाची तीव्रता आणि केंद्र यासंबंधीच्या माहितीचे करत असल्याचे कोरियाच्या हवामान खात्याच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.
अण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टिने उ. कोरियाने टाकलेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरिया हा अण्वस्त्रधारी देश आहे. याआधीही उ. कोरियाने २००६, २००९ आणि २०१३ मध्ये अणुचाचणी घेतली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26443

Posted by on Jan 6 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (937 of 2458 articles)


नवी दिल्ली, [५ जानेवारी] - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एक एप्रिलपासून नव्या आयकर नियमाची अधिसूचना जारी केली आहे. निश्‍चित ...

×