Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » ऊर्जासंकटामुळे पाकिस्तान काळोखात

ऊर्जासंकटामुळे पाकिस्तान काळोखात

Pakistan_Map1इस्लामाबाद, [२५ जानेवारी] – शनिवारी मध्यरात्री अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात भीषण ऊर्जासंकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात वीजपुरवठा खंडीत झाला असून बिघाड दुरुस्तीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. रविवारी दिवसभर दुरुस्तीचे काम चालले असले तरी अद्याप वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही.
हा बिघाड नेमक्या कोणत्या स्वरूपाचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून गेल्या महिन्याभरात चौथ्यांदा मोठ्या स्वरूपातील हा बिघाड झाला आहे. यामागील कारणांविषयी परस्परविरोधी विधाने देण्यात आल्याने नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही. बलुचिस्तान प्रांतातील नसिराबाद जिल्ह्यात गुड्डू वीजपुरवठा लाईन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात नष्ट झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी वृत्तसंस्थांनी दाखविल्या. नंतर पाणीपुरवठा आणि ऊर्जा मंत्री आबिद शेर अली यांनी दहशतवादी हल्ल्याचे खंडन करून तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले. मात्र, बलुचिस्तानात सक्रिय बलुच रिपब्लिकन आर्मी संघटनेचे प्रवक्ते सरबाझ बलुच यांनी बंडखोरांच्या हल्ल्यात २२० किलोवॅटच्या दोन वीजपुरवठा लाईन्स नष्ट झाल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी पाकमध्ये पेट्रोलचा भीषण तुटवडा निर्माण झाला होता. ही स्थिती दोन आठवड्यांपर्यंत कायम राहिली. त्यातून बाहेर पडताच देशासमोर ऊर्जासंकट उभे ठाकले आहे. सध्या देशात ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत असली तरी मागणी मात्र १४ हजार मेगावॅट आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20029

Posted by on Jan 26 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2183 of 2458 articles)


शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधानांची विमानतळावर हजेरी आजच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - उद्या सोमवारी साजर्‍या ...

×