Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » ऊसदराचे आंदोलन पेटले

ऊसदराचे आंदोलन पेटले

=साखर संकुलात तोडफोड=
raju_shettyपुणे, [१२ जानेवारी] – खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. उसाला एफआरपीनुसार भाव द्यावा, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पुण्यातील साखर संकुलात जबरदस्त तोडफोड केली. दरम्यान, याप्रश्‍नी सरकारने जबाबदारी झटकलेली नसल्याचे सांगून याविषयावर चर्चा करण्याचे आश्‍वासन राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन केले.
या आंदोलनाविषयी माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकर्‍यांना न्याय देण्याचे आश्‍वासन भाजपाने दिले होते. त्यामुळे आम्ही भाजपाला पाठिंबा दिला. आमच्या सहकार्यामुळेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. नव्या सरकारने ऊसदर निश्‍चितीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीत माझाही समावेश आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी सरकार किमान प्रयत्नशील असल्याचे दिसते. मागील सरकार हेसुद्धा करत नव्हते. सरकारच्या योग्य निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत.
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार दर देण्याचे आदेश देऊनही कारखानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने या कारखानदारांवर कारवाई करावी. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू, कॉंग्रेसप्रणीत सरकारला खाली खेचण्यासाठी १५ वर्षे लागली. मात्र, भाजपाप्रणीत सरकार १५ महिन्यात खाली खेचू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. दरम्यान, राज्य सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने असून, ऊसदराबाबत उद्या मंगळवारपासून चर्चा करण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात आंदोलन
थकित हप्त्यांचे पेसै न दिल्याने शेतकर्‍यांच्या रागाचा रविवारी रात्री उद्रेक झाला. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकर्‍यांनी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात आंदोलन करीत जाळपोळ केली. या जाळपोळीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कारखान्याचे किरकोळ नुकसान झाले.
वसंतदादा कारखान्याने उसाला गतवर्षी एफआरपीनुसार दर दिला नाही. जो पहिला हप्ता दिला तो केवळ १८०० रुपये. तसेच उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता दिलाच नाही. त्यामुळे हे पैसे दिले जावेत, अशी मागणी शेतकरी गेले अनेक दिवस करीत होते. परंतु, कारखाना व्यवस्थापनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांच्या भावनांचा रविवारी रात्री उद्रेक झाला. यात ही जाळपोळ करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19597

Posted by on Jan 13 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2248 of 2451 articles)


=पनगारिया यांनी स्वीकारली सूत्रे= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] - पं. नेहरू यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाची जागा घेणार्‍या ...

×