Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ऍण्टोनी, वीरेंद्रकुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ऍण्टोनी, वीरेंद्रकुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

election-commission-of-india-logoतिरुवनंतपुरम्, [१० मार्च] – कॉंग्रेस नेते व माजी संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी व जदयुचे प्रदेशाध्यक्ष एम. पी. वीरेंद्र कुमार यांनी आज गुरुवारी केरळातून राज्यसभेवर पाठविण्यासाठी होणार्‍या द्विवार्षिक निवडणुकीत युडीएफचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
ऍण्टोनी व वीरेंद्रकुमार यांनी आपले उमेदवारी अर्ज विधिमंडळ सचिवालयात राज्य विधिमंडळाचे सचिव पी. डी. शारंगधरम् यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री ओमन चंडी, केरळ प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व्ही. एम. सुधीरन, राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथाला, केसी-एम नेते के. एम. मणी, आययुएमएलचे नेते व उद्योग मंत्री पी. के. कुन्हालीकुट्टी व युडीएफचे इतर नेते उपस्थित होते.
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतील केरळच्या तीन जागा रिक्त होणार असून, सत्तारूढ कॉंग्रेसप्रणीत युडीएफ दोन आणि डाव्यांच्या नेतृत्वातील एलडीएफ एक जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. कॉंग्रेस नेते ऍण्टोनी, माकपचे टी. एन. सीमा व के. एन. बालगोपाल यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपुष्टात येणार आहे. दरम्यान, एलडीएफने ही जागा माकपला देण्याचा निर्णय घेतला असून, माकपने कोल्लम जिल्हा सचिव के. एस. सोमाप्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.
२१ मार्चला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. शुक्रवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, १४ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27206

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (705 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [१० मार्च] - भारत आणि अमेरिका यांच्यात चांगले आणि मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पुन्हा ...

×