Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » एकनाथ खडसे यांचा राजीनामा

एकनाथ खडसे यांचा राजीनामा

=निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी=
EKNATH KHADSE7मुंबई, [४ जून] – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भ्रष्टाचाराचे विविध आरोप होत असलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आज शनिवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
जमीन व्यवहारात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीची मागणी स्वत: खडसे यांनीच माझ्याकडे केली होती. त्यानुसार आता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्यावर विरोधकांकडून विविध आरोप केले जात होते. या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे, आपल्या देवगिरी या निवासस्थानातून खडसे एकटेच कारने वर्षावर गेले. यावेळी त्यांच्या कारवरील लाल दिवा झाकलेला होता.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. खडसे यांच्यावर जे आरोप करण्यात आले, त्यांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. सत्यता लवकरच बाहेर येईल. निष्पक्ष चौकशी होण्याकरिता खडसे यांनी राजीनामा सादर केला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
खडसे यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्रालयांची जबाबदारी होती. महसूल खात्यासोबतच कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मत्स्यपालन तसेच अल्पसंख्यक विकास व वक्फ मंत्रालयाची जबाबदारी होती. या सर्वच खात्यांचा त्यांनी राजीनामा दिला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28517

Posted by on Jun 5 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (260 of 2451 articles)


मुंबई, [४ जून] - रंगभूमीसोबतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज शनिवारी ...

×