Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » एकविसावे शतक आशियाचेच

एकविसावे शतक आशियाचेच

  • पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
  • पारदर्शक करप्रणाली आणण्याची ग्वाही
  • अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यावर भर

narendra modi 33क्वालालम्पूर, [२१ नोव्हेंबर] – एकविसावे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे स्पष्ट करताना भारतातील कररचना आणखी पारदर्शक आणि सोपी करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे दिली. आपल्या सरकारने आर्थिक आघाडीवर उचललेल्या पावलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर झाली असून, ती आणखी मजबूत करण्यावर सरकारने भर दिला असल्याची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली.
अलीकडील काळात आशियाई देशांची कामगिरी उल्लेखनीय अशीच राहिली आहे. भारत आणि आसियान देश हे नैसर्गिक मित्र असून, त्यांच्यात कोणताही दुरावा नाही, असे नरेंद्र मोदी यांनी आसियान बिझिनेस ऍण्ड इन्व्हेस्टमेंटच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले.
देशातील काही महत्त्वाच्या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला जास्तीत जास्त वाव देतानाच बौद्धिक संपदा हक्काचे रक्षण करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. सरकारच्या कठोर पावलांमुळे गेल्या १८ महिन्यांच्या काळात देशातील महागाईचा स्तर ऐतिहासिक नीचांकावर आला असून, आर्थिक विकासाचा दर नव्या उंचीवर जात आहे, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.
आर्थिक सुधारणा ही स्वत:हून संपणारी प्रक्रिया नाही. माझ्यासाठी अतिशय लांबचा टप्पा गाठणारी प्रक्रिया आहे. भारताला विकसित राष्ट्र करणे हाच या प्रक्रियेचा शेवट राहील. माझ्या सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात सत्तेची सूत्रे हाती घेतली, तेव्हा आर्थिक आघाडीवर देश मोठ्या आव्हानांचा सामना करीत होता. पायाभूत प्रकल्प ठप्प झाले होते. महागाईमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले होते. सुधारणांशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले होते. पण, सुधारणा म्हणजे काय, त्यामागचा नेमका उद्देश काय असावा, केवळ सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढविणे म्हणजे सुधारणा आहे की, केवळ समाजाचा विकास करणे पुरेसे होईल, असे विविध प्रश्‍न आम्ही स्वत:लाच विचारले आणि त्यातून देशाला विकसित राष्ट्र म्हणून समोर आणणे, हाच खरा विकास असल्याचे उत्तर आम्हाला मिळाले.
आसियान देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. ते एकत्र येऊन आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकतात. परिवर्तनासाठी बदल आवश्यक आहेत, असे सांगताना मोदी म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आम्ही सर्व काही करणार आहोत. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढविण्यावर आमचा विशेष भर राहणार आहे. करांच्या माध्यमातून येणार्‍या उत्पन्नात वाढ झाली आहे. रुपयाचे मूल्य स्थिरावले आहे. देशांतर्गत उत्पन्नातही वाढ झाली आहे. व्याजदरात मोठी कपात झाल्यामुळे नागरिकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गेल्या ६५ वर्षांची परंपरा मोडित काढून आम्ही विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आहे. भारतात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून, दररोज किमान २३ किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधण्यात येत आहेत.
चीनच्या पंतप्रधानांनी भेट घेतली
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आसियान परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. मलेशिया आणि सिंगापूर दौर्‍यावर आगमन झाल्यानंतर मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
तिरंगा उलटा फडकला
पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात चर्चेपूर्वी झालेल्या भेटीच्या काळात तिरंगा उलटा फडकविण्यात आला असल्याचे आढळून आले. तिरंग्याचा हिरवा भाग वर आणि भगवा खाली होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लगेच चूक दुरुस्त करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25639

Posted by on Nov 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1188 of 2458 articles)


बीजिंग, [२१ नोव्हेंबर] - चीनच्या आर्थिक मंदीचा फटका भारताला देखील बसला असून, याबाबतीत चीन आणि भारत समदुःखी असल्याचे मत भारतीय ...

×