Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » एकविसावे शतक आशियाचे

एकविसावे शतक आशियाचे

=चीन भेटीपूर्वी पंतप्रधानांचा विश्‍वास=
pm-narendra-modiनवी दिल्ली, [१३ मे] – माझा चीन दौरा केवळ भारत आणि चीन या दोन देशांचे संबंध मजबूत करण्यासाठीच नसून, संपूर्ण आशियाला विकासाचा नवा किरण दाखविणारा सिद्ध होणार आहे. एकविसावे शतक हे आशियाचेच राहणार आहे, असा जबरदस्त विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी व्यक्त केला.
पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिलाच चीन दौरा ठरणार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील चीनचा वाढता प्रभाव आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वारंवारच्या घुसखोरीमुळे निर्माण होणारा तणाव या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या तीन दिवसीय चीन दौर्‍याला उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. आपल्या या भेटीने आशियात नवा मापदंड प्रस्थापित होईल, असे ते म्हणाले.
या दौर्‍यात पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची त्यांचे जन्मगाव असलेल्या शियान या ऐतिहासिक शहरात भेट घेणार आहेत. जिनपिंग यांच्या भारत दौर्‍यात मोदी यांनी त्यांचे अहमदाबाद शहरात भव्य स्वागत केले होते. त्यावेळी मोदी राजशिष्टाचार बाजूला सारून अहमदाबादेत गेले होते. याच पार्श्‍वभूमीवर जिनपिंग यांनीही राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारून मोदी यांचे आपल्या शियान येथे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.
२१ वे शतक केवळ आशियाचे राहणार आहे. चीन भेटीसंदर्भात मी अतिशय उत्सुक आहे. माझ्या या भेटीमुळे केवळ भारत-चीन संबंधच अधिक दृढ होतील, असे नव्हे, तर आशिया व जगातील अन्य विकसनशील देशांमधील परस्पर संबंधासाठीही माझी चीन भेट एक मापदंड ठरणार आहे, असे पंतप्रधानांनी चिनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22548

Posted by on May 14 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1695 of 2453 articles)


=केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीशांचीच छायाचित्रे असतील, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय= नवी दिल्ली, [१३ मे] - करदात्यांचा पैसा हा घामाचा आहे. ...

×