Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » एकाच महिन्यात स्वाईन फ्लूचे २०० बळी

एकाच महिन्यात स्वाईन फ्लूचे २०० बळी

=आरोग्य मंत्रालयाने घेतला आढावा=
swineflu h1n1नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – एच१एन१ अर्थातच स्वाईन फ्लू या संसर्गजन्य घातक आजाराने देशभरात थैमान घातले असून, यावर्षी आतापर्यंत या रोगाने मृत्यू झालेल्यांची संख्या २०१ च्या घरात गेली आहे. हा आकडा २०१४ मध्ये वर्षभरात झालेल्या मृत्यूच्या संख्येच्या जवळपास पोहोचला आहे.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला आणि या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. आरोग्य सचिव बी. पी. शर्मा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असलेल्या तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आवश्यक ते निर्देश दिले.
आरोग्य मंत्रालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २ फेब्रुवारीपर्यंत स्वाईन फ्लूने देशात २०१ जणांचा बळी घेतला आहे. गेल्यावर्षी वर्षभरात २१६ जणांचा मृत्यू झाला होता. यावरूनच यावर्षी स्वाईन फ्लूने घातलेल्या थैमानाची तीव्रता लक्षात येऊ शकते. स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांच्या संख्येबाबत राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये आतापर्यंत ६६८ जणांना स्वाईन फ्लूची बाधा आणि ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशात एकूण ५४ रुग्णांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत स्वाईन फ्लूचे ५१० रुग्ण आढळून आले असले तरी पाचच जणांचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये ३२० स्वाईन फ्लू रुग्णांपैकी ४२ जणांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे.
राज्यात १६ जणांचा मृत्यू
मुंबईः मुंबईसह महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला असून विविध रुग्णालयात २५० पेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. एकट्या नागपूरमध्ये आतापर्यंत १३, तर लातूरमध्ये दोघांचा बळी गेला असून पालघरमध्येही एका रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. नागपुरात ३० जणांवर उपचार सुरू असून, लातूर जिल्हा रुग्णालयात बुधवारपर्यंत पाच संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. पालघरमध्ये आणखी चार जण अत्यवस्थ असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ही माहिती दिली आहे.
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हे करा…
– लागण झालेल्या व्यक्तीशी संपर्क टाळा
–  खोकलताना, शिंकताना तोंड, नाक अवश्य झाका
–  निर्जंतुक साबण, पाण्याने हात वारंवार धुवा.
– लहान मुलांबाबत विशेष काळजी घ्या.
–  ताप जास्त असला अथवा श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा
हे करू नका…
– एकमेकांच्या संपर्कात आल्याने सध्या स्वाईन फ्लू वेगाने पसरत आहे. त्यामुळे जनसंपर्क आणि गर्दीची ठिकाणे टाळा.
–  लागण झालेल्या व्यक्तीला भेटायला जाताना तोंडावर ‘मास्क’ घाला.
–  हात व्यवस्थित धुतल्याशिवाय तोंड अथवा नाकाला स्पर्श करू नका.
– आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांची खोली, वापरलेल्या वस्तू आधी स्वच्छ करा.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20339

Posted by on Feb 6 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2111 of 2451 articles)


=उत्तर कोरियाची धमकी= प्योंगयोंग, [५ फेब्रुवारी] - गँगस्टरसारख्या अमेरिकन प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी आता कोणताही वाव उरला नसल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट ...

×