Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » एक एप्रिलपासून नवा आयकर नियम

एक एप्रिलपासून नवा आयकर नियम

Income Tax Departmentनवी दिल्ली, [५ जानेवारी] – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एक एप्रिलपासून नव्या आयकर नियमाची अधिसूचना जारी केली आहे. निश्‍चित रकमेपेक्षा जास्त रोख रकमेच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
रोख प्राप्ती, शेअर खरेदी, म्युच्युअल फंड, स्थिर संपत्ती, फिक्स डिपॉझिट, विदेशी मुद्रा खरेदी-विक्रीची माहिती नव्या प्रारूपात विभागाला सादर करणे आता आवश्यक आहे.
३० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अचल संपत्तीच्या खरेदी विक्रीची सूचनाही विभागाला देणे गरजेचे असल्याचे वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बँक ग्राहकाच्या एक किंंवा एकपेक्षा अधिक खात्यात, आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यासही याची सूचना बँकांना देणे बंधनकारक राहणार आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू किंवा सेवेसाठी देखील हा नियम लागू असणार आहे. डाक खात्यातील व्यवहारही या नियमाच्या अंतर्गत येणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26441

Posted by on Jan 6 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (933 of 2453 articles)


अफगाणिस्तान, [५ जानेवारी] - अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे भारतीय दुतावासजवळ आज मंगळवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी ...

×