‘एक भारत, श्रेष्ठ भारत’
Monday, November 30th, 2015=‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे मनोगत=
नवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] – दादरी घटनेच्या पार्श्वभूमीवर देशात असहिष्णुता असल्याचे चित्र रेखाटून विरोधकांनी रान उठविले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी देशाची एकता आणि सलोखा मजबूत करण्यासाठी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पना मांडली. एकता व सलोखा मजबूत होईल, यासाठी देशवासीयांनी आपल्या सूचना आणि मते सरकारला पाठवावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल याच्या जयंतीनिमित्त मी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा संदेश दिला होता. या संकल्पनेला मला आकार द्यायचा आहे आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे, असे पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील अतिशय लोकप्रिय अशा ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करताना सांगितले.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारणे फार कठीण नाही. तुम्ही आपली विवेकबुद्धी जागृत करा आणि नवनव्या कल्पना पाठवा. एकता आणि सलोखा या मंत्राशी देशातील प्रत्येक नागरिकाला कसे जोडता येईल, याविषयी तुमच्या सूचनांची मला खरोखरच गरज आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विविध विषयांना स्पर्श केला. देशातील विविध भागात गेल्या काही दिवसांत कमी-जास्त पाऊस झाला असून, तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे. या संकटाच्या काळात केंद्र सरकार तामिळनाडूच्या पाठीशी उभे आहे, असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी या कार्यक्रमात देशवासीयांकडून मिळालेले काही ध्वनिमुद्रित संदेशही ऐकविले. त्यात जालंदर येथे जैविक शेती करणारे लखविंदर सिंह यांचा संदेश महत्त्वाचा होता. सिंह यांनी शेतीतील अनावश्यक गवत नष्ट करण्यासाठी लोक आग लावत असल्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आणि हा प्रकार कसा थांबविता येईल, असा प्रश्न विचारला. त्यावर, शेतीतील नको असलेल्या गवताला आग लावण्यापेक्षा ते चारा म्हणून गरजवंतांना द्या, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आणि शेतकर्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या गरजेवर भर दिला.
येत्या ३ डिसेंबर रोजी संपूर्ण जग जागतिक अपंग दिवस साजरा करीत आहे. जे लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग आहेत, त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळत असते, त्यामुळे त्यांच्याकडे दयाभावनेने पाहण्याचा दृष्टीकोन बदलविण्याची आवश्यकता आहे, असे सांगताना त्यांनी १९९६ मध्ये काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले जावेद अहमद यांचे उदाहरण दिले. जखमी झाल्याने पुढील आयुष्य समाजकार्यासाठी देण्याचा संकल्प अहमद यांनी केला आहे आणि त्याच अनुषंगाने ते कार्य करीत आहेत, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
वातावरण बदलाविरोधात लढा उभारा
पंतप्रधानांनी यावेळी वातावरणात झपाट्याने होत असलेल्या बदलांकडेही देशवासीयांचे लक्ष वेधले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आधीच प्रचंड नुकसान झाले असल्याने आता आपल्या पृथ्वीवरील तापमानात वाढ होणार नाही, याची काळजी घेण्याची आणि त्या दृष्टीने लढा देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकांचीच आहे, असे आवाहनही त्यांनी केले. आपण ऊर्जेच्या बचतीवर भर द्यायला हवा आणि त्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित उपकरणांचा जास्तीतजास्त वापर करण्याची गरज आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25861

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!