Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एटीएममधून पैसे काढणे महागणार

एटीएममधून पैसे काढणे महागणार

ATM-receiptनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – आगामी काळात एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) सरकारला याबाबत सूचना करून एटीएममधून पैसे काढण्यावर अर्धा टक्का शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. कॅशलेस इकॉनॉमीला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार कॅटने आपल्या अर्थसंकल्पापूर्वी एका निवेदनातून हा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये म्हटल्याप्रमाणे एटीएममधून पैसे काढल्यास ०.५ टक्के दर आकारला जावा अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर बँकांकडून डेबिट व क्रेडिट कार्डावर आकारण्यात येणारे शुल्कही यापुढे लागू न करण्याविषयी सांगण्यात आले आहे. तसेच कार्डद्वारे पैसे भरणार्‍या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देण्यात यावी त्याचबरोबर विविध करांमधूनही त्यांची मुक्तता व्हावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26631

Posted by on Jan 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (877 of 2453 articles)


=लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचे मत= अहमदाबाद, [२५ जानेवारी] - देशातील मागास वर्गासाठी लागू करण्यात आलेल्या आरक्षणाला ६५ वर्षे पूर्ण ...

×