Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » एनएसए चर्चेत केवळ दहशतवाद हाच मुद्दा

एनएसए चर्चेत केवळ दहशतवाद हाच मुद्दा

=राजनाथसिंह यांची भूमिका=
RAJNATH SINGHलखनौ, [२२ ऑगस्ट] – भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) बैठकीत केवळ दहशतवाद हाच एकमेव मुद्दा राहणार आहे. याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा या बैठकीत उपस्थित होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे विशद केली.
एनएसए स्तरावरील चर्चेचा अजेंडा रशियाच्या ऊफा शहरातच निश्‍चित झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील बैठकीतच एनएसए चर्चा कोणत्या मुद्यावर होईल, याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे आणि दोन्ही देशांनी तो मान्यही केला आहे. त्यामुळे आता या अजेंड्याला पाठ दाखविण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. दहशतवादाच्या मुद्यापासून पळ काढण्याचा पाकचा प्रयत्न म्हणजे ऊफा अजेंड्याचे उल्लंघनच आहे, अशा शब्दात राजनाथसिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना पाकवर हल्ला चढविला.
ऊफा अजेंड्यावर भारत ठाम असून, आम्ही आपली भूमिका कधीच बदलणार नाही. उद्या रविवारी दिल्लीत एनएसए पातळीवर बैठक होऊ घातली आहे. पाकच्या हेकेखोर वृत्तीमुळे ती जर रद्द झाली, तर काहीच प्रश्‍न नाही. पण, बैठक झाल्यास त्यात केवळ दहशतवादावरच चर्चा केली जाईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
ही चर्चा रद्द होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता, आम्ही आपली भूमिका मांडली आहे. भारत आणि पाकच्या द्विपक्षीय संबंधात तिसर्‍या कोणाच्याही मध्यस्थीला स्थान नसल्याने काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांच्या भेटीची परवानगी आम्ही पाकला देणार नाही. त्यामुळे भारतासोबत चर्चा करायची की नाही, याबाबतचा निर्णय पाकनेच घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दाऊदची बातमी नवीन नाही
दाऊद हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानातच आहे, याची आम्हाला माहिती आहे. याबाबतचे ठोस पुरावेही आम्ही पाकला दिले आहेत. पाकने आतापर्यंत केवळ नकारच दिला आहे. दाऊद हा पाकमध्येच आहेत. पाक सरकारने अनेक शहरांमध्ये त्याच्या राहण्याची व्यवस्था केली असल्याने तो केवळ आपले ठिकाण बदलवित असतो. त्यामुळे दाऊदबाबतच्या वृत्तात नवीन असे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23669

Posted by on Aug 23 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1511 of 2453 articles)


=पाकची मुजोरी कायम= इस्लामाबाद, [२२ ऑगस्ट] - भारत आणि पाक यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये (एनएसए) चर्चा व्हावी, असे आम्हाला मनापासून ...

×