Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » एनएसजीसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

एनएसजीसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

=चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार=
Vladimir Putinमॉस्को, [१८ जून] – पुढील आठवड्यात सेऊल येथे होणार्‍या अणुपुरवठादार देशाच्या (एनएसजी) बैठकीत भारताच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची घोषणा रशियाने केली आहे. यामुळे भारताची दावेदारी आणखीच मजबूत झाली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणाले की, ४८ सदस्यीय एनएसजी राष्ट्रसमूहात प्रवेश करण्यासाठी भारत हा सर्वोत्तम दावेदार आहे. त्यामुळे भारताला सदस्यत्व मिळावे, यासाठी आपण पूर्ण सहकार्य करणार आहोत. भारताच्या दावेदारीला चीन कोणत्या आधारावर विरोध करीत आहे, यावरही आम्ही चीनसोबतही चर्चा करू.
या बैठकीत आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काहीच करणार नाही. अन्य काही देशांचेही अर्ज आले आहेत. त्यावरही गंभीरपणे विचार करण्यात येणार आहे. अणुसुरक्षेबाबत भारत नेहमीच गंभीर राहिला आहे. त्यामुळे या देशाला सदस्यत्व देण्यात काहीच अडचण जायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28646

Posted by on Jun 19 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (221 of 2458 articles)


=राजनाथसिंह यांचे नक्षल्यांना आवाहन= बिलासपूर, [१८ जून] - हिंसाचाराचा मार्ग सोडा आणि शांतता चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय ...

×