Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » एपीजी ठेवणार ‘मोस्ट वॉण्टेड’वर नजर

एपीजी ठेवणार ‘मोस्ट वॉण्टेड’वर नजर

=भारताच्या व्यूहरचनेला मोठे यश=
Lakhvi,Hafiz,Dawoodनवी दिल्ली, [३० जून] – भारतातील महत्त्वपूर्ण गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला दाऊद इब्राहिम, मुंबई हल्ल्याचा मास्टमाईंड जकी-उर-रहमान लखवी आणि हाफीज सईद यांच्यावर संयुक्त राष्ट्र संघाचे ‘पॅसिफीक ग्रुप ऑफ एनफोर्स’ निगराणी करणार आहे. भारताच्या यासंदर्भातील मागणीला, चीनचा प्रखर विरोध झुगारून संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिल्याने हे भारताचे मोठैच राजनयिक यश मानले जात आहे.
या सर्वांवर लक्ष ठेवण्यामागे भविष्यात त्यांच्यावर निर्बंध घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच, पाकिस्तानच्या वरदहस्ताने चालणार्‍या दहशतवादी कारवायांवरही आता संयुक्त राष्ट्रसंघाची करडी नजर राहणार आहे. एपीजीच्या निगराणीमुळे पाकिस्तानवरील दबाव वाढणार असल्याने त्यांच्याविरोधात कठोर कारवाईकडेही पाकला लक्ष द्यावे लागणार आहे. याआधीही भारताने केलेल्या मागणीवर चीनने हस्तक्षेप करीत, भारताने या तिघांच्याही विरोधात पुरेसे पुरावे दिलेले नसल्याने हा निर्णय घेणे अशक्य असल्याचा युक्तिवाद केला होता. शिवाय, भारत एफटीएफ अर्थात आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित कृत्यावर कारवाई करणार्‍या देशांच्या संघटनेचा सदस्य नसल्याचेही चीनने म्हटले होते. भारताने दहशतवादी हाफीज सईद आणि दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त करण्याचीही मागणी केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23194

Posted by on Jul 1 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1588 of 2453 articles)


नवी दिल्ली, [३० जून] - भारतीय युवकांमध्ये सध्या सोशल नेटवर्किंग जबरदस्त लोकप्रिय आहे. त्यात व्हॉट्‌स ऍपसोबतच फेसबुक वापरणार्‍यांची संख्याही बरीच ...

×