Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » एफडीआयची माहिती आयबी, रॉला देणार

एफडीआयची माहिती आयबी, रॉला देणार

=काळ्या पैशावर आरबीआयचे धोरण=
RBI-BULDINGनवी दिल्ली, [७ मार्च] – केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीसाठी देशाची दारे खुली केली असली, तरी या माध्यमातून विदेशातील काळा पैसा भारतात येऊ नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) विदेशी गुंतवणुकीशी संबंधित काही विशिष्ट माहिती आयबी आणि रॉ यासारख्या गुप्तचर संस्थांना उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
आर्थिक गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय गटाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कर बुडविणार्‍यांसाठी नंदनवन असलेल्या देशांमधील अनेक कंपन्या आपला काळा पैसा भारतात आणत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आयबी आणि रॉ यासारख्या गुप्तचर संस्थांचे नियंत्रण करणार्‍या कॅबिनेट सचिवालयाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.
अशा कंपन्यांच्या काळ्या पैशाच्या स्रोतांचा शोध घेऊन तो भारतात येण्यापासून रोखण्याची आवश्यकता विशद करतानाच कॅबिनेट सचिवालयाने असेही सुचविले आहे की, अर्थमंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाने अशा कंपन्यांची आणि त्यांच्याकडून भारतात होत असलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती प्राप्त करून, ती साठवून ठेवावी. पण, उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत नंतर आणखी एक प्रस्ताव सादर झाला. विदेशी गुंतवणुकीबाबतची माहिती आरबीआयकडे उपलब्ध असल्याने देशातील या शिखर बँकेनेच त्यांच्याकडील विशिष्ट माहिती आयबी आणि रॉला उपलब्ध करून द्यावी. आरबीआयला हा प्रस्ताव मान्य झाला असून, त्यानुसार आतापर्यंतची सर्व माहिती गुप्तचर संस्थांना देण्याचे धोरण आरबीआयने तयार केले आहे, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27102

Posted by on Mar 7 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (740 of 2453 articles)


=जेएनयू रजिस्ट्रारचा खुलासा= नवी दिल्ली, [७ मार्च] - संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अफजल गुरूच्या समर्थनार्थ गेल्या ९ ...

×