Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » एसएआर गिलानीलाही जामीन

एसएआर गिलानीलाही जामीन

sar-gilani-arrested-for-sedition-in-afzal-guru-caseनवी दिल्ली, [१९ मार्च] – संसद हल्ल्यातील संशयित आरोप आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेला दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक एसएआर गिलानीलाही स्थानिक पतियाळा हाऊस न्यायालयाने आज शनिवारी जामीन मंजूर केला.
शुक्रवारी न्यायालयाने गिलानीच्या जामिनावरील आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर त्याने पतियाळा हाऊस न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे नव्याने याचिका दाखल केली. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक गर्ग यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. आज त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने गिलानीला जामीन मंजूर केला.
प्रेस क्लबतर्फे आयोजित एका कार्यक्रमात गिलानीने गेल्या १० फेबु्रवारी रोजी अफजल गुरू आणि मकबूल भटला हुतात्मा जाहीर करताना सरकारविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27460

Posted by on Mar 20 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (611 of 2452 articles)


=अरुण जेटलींची प्रशंसा= नवी दिल्ली, [१९ मार्च] - भारतातील सर्वांत लहान समुदाय असलेल्या पारशी समाजाने आजवर कधीही स्वत:ला अल्पसंख्यक म्हणवले ...

×