Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » एससीओ सदस्यत्वामुळे विकासाला चालना मिळेल : पंतप्रधान

एससीओ सदस्यत्वामुळे विकासाला चालना मिळेल : पंतप्रधान

Tashkent : Prime Minister Narendra Modi during the SCO summit in Tashkent on Friday.PTI Photo by Subhav Shukla(PTI6_24_2016_000053A)

ताश्कंद, [२४ जून] – भारताला शांघाय कॉ-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (एसईओ) पूर्ण सदस्यत्व मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच, या भागीदारीमुळे वाढता कट्टरवाद, हिंसाचार व दहशतवादाच्या धोक्यापासून या भागाला वाचविणे शक्य होणार असून, आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला.
एससीओचे सदस्यत्व मिळाल्यामुळे याच्या ऊर्जा व नैसर्गिक स्रोतांच्या शक्तीचा भारताला फायदा होणार असून, दुसरीकडे भारताची बळकट अर्थव्यवस्था व मोठी बाजारपेठ यामुळे या भागाचा वेगाने आर्थिक विकास होऊ शकेल, असे पंतप्रधान मोदी यांनी एससीओ परिषदेतील आपल्या संबोधतान सांगितले.
एससीओचे सदस्यत्व मिळाल्यामुळे या भागाच्या भरभराटीत भारतही योगदान देऊ शकेल. याशिवाय या भागाची सुरक्षा व्यवस्था मजबूत होण्यासह या भागीदारीमुळे द्वेष, हिंसाचार आणि दहशतवाद यासारख्या कट्टरवादी समस्यांपासून आमच्या समाजाचे रक्षणही होऊ शकेल, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत एससीओच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. दहशतवाद कदापि सहन न करण्याचे आमचे धोरण असून, सर्व स्तरांवर दहशतवादाचा कठोरपणे मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक भूमिका घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारताला एससीओचे सदस्यत्व दिल्याबद्दल सदस्य देश आणि नेत्यांचे आम्ही आभारी आहोत. एससीओचा नवा सदस्य म्हणून मी पाकिस्तानचेही स्वागत करतो, असेही पंतप्रधान म्हणाले. आर्थिक सहकार्य वाढविण्यावर भर देताना मोदी म्हणाले की, व्यापार, गुंतवणूक, माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान, अंतराळ, कृषी, आरोग्य सेवा, लघु व मध्यम उद्योग यामधील आमच्या क्षमतेमुळे रशिया, चीन, किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान व उझबेकिस्तान या एसीसीओच्या सदस्य देशांनाही लाभ होऊ शकतो.
या परिषदेत एससीओच्या मेमोरॅण्डम ऑफ ऑब्लिगेशनवर स्वाक्षरी करताच भारताला पूर्ण सदस्यत्व मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारताला येत्या वर्षभरात आणखी ३० दस्तावेजांवर स्वाक्षरी करावी लागणार आहे. पाकिस्तानचाही एससीओमध्ये पूर्ण सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे, हे विशेष.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28774

Posted by on Jun 25 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (187 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२४ जून] - ब्रिटनने युरोपियन समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर होताच त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर दिसून आला. युरोपियन ...

×