Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » एस जयशंकर नवे परराष्ट्र सचिव

एस जयशंकर नवे परराष्ट्र सचिव

s_jaishankarनवी दिल्ली, [२९ जानेवारी] – परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज गुरूवारी सकाळी त्यांनी १० वाजता त्यांनी पदभार सांभाळला.
१९७७ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असलेले जयशंकर यांनी आज सचिवपदाचा कार्यभार हाती घेतला. परराष्ट्र सचिव म्हणून ते पुढील दोन वर्ष कार्यभार सांभाळणार आहेत. जयशंकर हे अमेरिके तील राजदूत पदावर कार्यरत होण्याआधी भारताचे चीनमधील राजदूत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जयशंकर यांच्या नियुक्तीबाबत बुधवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला. नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेला गेले असताना तसेच ओबामा भारत दौर्‍यावर आले असताना जयशंकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. यामुळेच त्यांच्याकडे सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याची चर्चा आहे.
सुजाता सिंह यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुजाता सिंह यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार हाती घेतला होता. दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या जुलैमध्ये संपणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी असा तडकाफडकी राजीनामा दिला. यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जयशंकर यांची पदभार सांभाळल्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. जयशंकर यांना परराष्ट्र सचिव करून केंद्राने चांगला निर्णय घेतला आहे. ते एक चांगले परराष्ट्र सचिव बनू शकतील, असे जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
 व्हाईट हाऊसकडूनही स्तुती
६६ व्या प्रजासत्ताकदिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत राजपथावर झालेल्या संचलनादरम्यान नागपुरातील १६० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पथकाने लेझिमचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने ओबामा इतके प्रभावित झाले की, व्हाईट हाऊसने संकेतस्थळावर हे छायाचित्र अपलोड करून ‘फोटो ऑफ द डे’ असा उल्लेख करीत त्याचे कौतुक केले. ओबामांच्या उपस्थितीने यंदाच्या प्रजासत्ताकदिनी सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. यावेळी विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण करण्यासाठी विविध दृष्यांचे रथ व नृत्य सादर करण्यात आले. नागपुरातील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मार्गदर्शनात नागपुरातील २० शाळांमधील या १६० जणांच्या मनातही हा दिवस कायम लक्षात राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20167

Posted by on Jan 30 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2148 of 2453 articles)


मुंबई, [२९ जानेवारी] - मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून किमान तीन वर्षाची सेवा दिलेल्या व निवृत्तीनंतर महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या ...

×