Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ऑगस्टावरील बंदी आदेशाची प्रत दाखवा

ऑगस्टावरील बंदी आदेशाची प्रत दाखवा

=पर्रीकरांचे कॉंगे्रसला आव्हान=
manohar-parrikar_99नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – ३६५ कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात सहभागी असलेल्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीवर संपुआ सरकारने बंदी घातली होती, असा दावा कॉंगे्रसतर्फे करण्यात येत आहे. या बंदी आदेशाची प्रत कॉंगे्रस पक्षाने सादर करावी, असे थेट आव्हान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.
इटालियन न्यायालयाने हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्याप्रकरणी दिलेल्या निकालाची प्रत आम्हाला प्राप्त झाली आहे. त्याचा इंग्रजीत अनुवाद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला ८ ते १० दिवस लागतील. या विषयावर मी लवकरच संसदेतही बोलणार आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढविताना, इटली भाषेतून इंग्रजीत अनुवाद करणे इतके सोपे काम नाही. कॉंगे्रसकरिता हे काम सोपे असू शकते. पण, निदान भाजपासाठी तरी ते अवघडच आहे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला.
संपुआने ऑगस्टा वेस्टलॅण्डला काळ्या यादीत टाकले असता, रालोआ सरकारनेच या कंपनीवरील बंदी उठविली होती, असा आरोप कॉंगे्रसच्या एका वरिष्ठ नेत्याने केला होता. हाच धागा पकडून, पर्रीकर म्हणाले की, संपुआने जर या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते, तर मग त्या आदेशाची प्रत कुठे आहे, आदेशाची तारीख कोणती आहे आणि कॉंगे्रस पक्ष तो आदेश सादर करू शकतो काय? हे या पक्षाला आधी विचारायलाच हवे.
संपआचा दावा खोटा
संपुआ सरकारने ऑगस्टा वेस्टलॅण्डला काळ्या यादीत टाकले होते, हा कॉंगे्रसचा दावा खोटा आहे. उलट, मे २०१४ भाजपाप्रणीत रालोआ सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर या सरकारनेच ३ जुलै रोजी या कंपनीला निलंबित यादीत टाकले होते, असे संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28046

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (419 of 2453 articles)


=भाजपाचा कॉंगे्रसला सवाल= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात कॉंगे्रस नेत्यांना व संपुआ सरकारला अडकविणे म्हणजे नरेंद्र मोदी ...

×