Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » ऑगस्टा वेस्टलॅण्डवरून राज्यसभेत गदारोळ

ऑगस्टा वेस्टलॅण्डवरून राज्यसभेत गदारोळ

New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo / TV GRAB  (PTI12_22_2015_000269A)

New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo / TV GRAB (PTI12_22_2015_000269A)

नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या मुद्यावरून आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा स्थगित करावे लागले. या मुद्यावरून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोपही झाले.
भाजपाचे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नियम २६७ नुसार नोटीस देत ऑगस्टा वेस्टलॅण्डचा मुद्दा उपस्थित केला. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव घेतल्यामुळे कॉंग्रेस सदस्य संतप्त झाले आणि घोषणा देत वेलमध्ये आले. सोनिया गांधी या प्रकरणातील मुख्य लाभार्थी असल्याचा आरोप डॉ. स्वामी यांनी इटली येथील न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पत्राच्या आधारे केला. सोनिया गांधी यांची याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी डॉ. स्वामी यांनी केली. भाजपा सदस्यही प्रत्युत्तरात उभे झाले. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. कॉंग्रेसला बदनाम करण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी केला. कॉंग्रेसचे सदस्य सत्ताधारी बाकांकडे पाहता हातवारे करत होते. त्याला भाजपाचे सदस्यही तेवढ्याच जोराने प्रत्युत्तर देत होते. त्यामुळे वातावरण तापले. दोन्ही बाजूच्या सदस्यात हातापायी होण्यासारखी स्थिती निर्माण झाली. कोणताही अनुचित प्रसंग उदभवू नये म्हणून सत्ताधारी तसेच विरोधी सदस्यांमध्ये मार्शल तैनात करण्यात आले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
केंद्र सरकारने इटली सरकारशी या संदर्भात सौदा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची भेट घेतली, त्या भेटीत या संदर्भात सौदा झाल्याचा आरोप आझाद यांनी केला. अर्थमंत्री आणि सभागृहाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी हा आरोप फेटाळून लावला. पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान यांची कोणतीही भेट झाली नाही, त्यामुळे त्यांच्यात सौदा होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे जेटली म्हणाले. सरकार राजकीय सूडबुद्धीने कोणतीही कारवाई करत नाही, असे जेटली म्हणाले. याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. या मुद्यावरून दोन्ही बाजू आक्रमक असल्यामुळे सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळा आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28035

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (423 of 2453 articles)


=हॅकर्सचा दावा= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - गँगरीनने शेवटचा टप्पा गाठल्याने सध्या आयुष्यासाठी संघर्ष करीत असलेला अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन आणि ...

×