Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ओबामांच्या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध दृढ

ओबामांच्या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध दृढ

=व्हाईट हाऊसचे मत=
white-houseवॉशिंग्टन, [२४ जानेवारी] – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीने जगातील सर्वात मोठ्या दोन लोकशाही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी बळकट होतील, असा विश्‍वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला आहे. ओबामांची दुसरी भारत भेट दोन देशांमधील संबंधात मैलाचा दगड सिद्ध होईल, असेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
भारताच्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओबामांनी उपस्थित राहणे ही द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मोठी संधी असल्याचे मत दक्षिण आशिया राष्ट्रीय सुरक्षा समितीचे वरिष्ठ संचालक फिल रेनर यांनी व्हाईट हाऊस येथे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. उद्या रविवारपासून सुरू होत असलेल्या ओबामा यांच्या भारत भेटीत संरक्षण आणि सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, हवामानातील बदल, अणुऊर्जा सहकार्य यासारख्या मुद्यांवर प्रगती होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली. या क्षेत्रातील धोरणात्मक सहकार्य केवळ इच्छा आहे म्हणून नव्हे तर गेल्या सप्टेंबर महिन्यापासून उच्चस्तरीय संबंधांतील सक्षमता दर्शवितात, असे त्यांनी सांगितले. या दौर्‍यामुळे अवकाश सहकार्य, कर्करोग संशोधन या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबत मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20038

Posted by on Jan 26 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2181 of 2458 articles)


गुरुकुंज मोझरी, [२५ जानेवारी] - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी प्रीत्यर्थ अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम व महाराष्ट्र शासन ...

×