Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ओबामांनी केली शिखांची स्तुती

ओबामांनी केली शिखांची स्तुती

President Barack Obama Speaks at a Meeting of the Democratic Governors Associationवॉशिंग्टन, [५ फेब्रुवारी] – भीतीविरुद्ध सर्वधर्मीय नागरिक एकत्र आले तर त्यामुळे निर्माण होणार्‍या शक्तिविषयी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शीख समुदायाने केलेल्या मानवी कार्याचा आवर्जून उल्लेख करून त्यांची स्तुती केली. विविध धर्मांच्या आणि जगभरातील नेत्यांच्या उपस्थितीत नॅशनल प्रेयर ब्रेकफास्टच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते. हैतीमध्ये जेव्हा भूकंप झाला, तेव्हा ख्रिश्‍चन, शीख आणि अन्य धर्माचे लोक सहकार्यासाठी पुढे आले. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आणि बेघर झालेल्यांकरिता घर उभारण्यासाठी त्यांनी आपले स्वयंसेवक पाठवले होते, याचे स्मरणही ओबामांनी यावेळी उपस्थितांसमोर केले.
याशिवाय जगभरात ठिकठिकाणी झालेल्या अन्य अनेक नैसर्गिक संकटांमध्ये शिखांनी केलेल्या कार्याचेही त्यांनी यावेळी स्मरण केले. जेव्हा पश्‍चिम आफ्रिकेत इबोलाची साथ आली तेव्हा ख्रिश्‍चन, यहुदी आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी योगदान दिले. इबोलाच्या वृत्तामुळे भीती पसरल्यानंतर चर्च, मशिदी आणि आपापल्या धर्मस्थळांमध्ये लोकांना राहण्यास जागा दिली. जेव्हा चार्ल्सस्टन चर्चच्या तळघरात असलेल्या भक्तांची हत्या झाली तेव्हा अन्य धर्मीयांनी या समूहाच्या लोकांना जवळ केले. सीरियातील शरणार्थींना मंदिर, मशीद, चर्च आणि अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागा दिली तसेच त्यांच्यासाठी पांघरुण, जेवणही मोफत देऊ केले. माणसामध्ये ईश्‍वर आहे, त्याची पूजा करावी; हे आमचे खरे जीवन मूल्य असल्याचेही ते म्हणाले.
इतरांप्रमाणेच मलाही अनेकदा भीती वाटते. मात्र, तुमच्यातला धर्म, तुमच्यात दिसणारा ईश्‍वरच मला माझ्या भविष्याप्रती आशावादी करतो, अशा शब्दात ओबामांनी आपल्या भावना मांडल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26728

Posted by on Feb 6 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (864 of 2458 articles)


नवी दिल्ली, [४ फेब्रुवारी] - संसदेत अर्थसंकल्पाचे पहिले सत्र २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर ...

×