Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ओबामा म्हणजे चर्चच्या हातचे बाहुले

ओबामा म्हणजे चर्चच्या हातचे बाहुले

=विहिंपची बोचरी टीका=
vhpनवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – भारतात धार्मिक तेढ शिगेला गेली आहे… महात्मा गांधी आज जिवंत असते, तर त्यांनाही धक्का बसला असता, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर विश्‍व हिंदू परिषदेने अतिशय बोचरी टीका केली आहे. ओबामा हे तर चर्चच्या हातचे बाहुले आहेत. त्यांनी आधी त्यांच्याच देशात कृष्णवर्णियांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी पावले उचलावी आणि नंतरच भारताविषयी भाष्य करावे, असा टोलाही विहिंपने हाणला.
ख्रिश्‍चन लॉबीला खुश करण्यासाठीच ओबामा यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे, अशी टीका विहिंपचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी केली. विशेष म्हणजे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पीएमओनेही ओबामांची ही राजकीय अपरिहार्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
भारतातील धार्मिक स्थितीवर भाष्य करण्याआधी बराक ओबामा यांनी आधी आपल्या देशातील परिस्थिती तपासावी. ते स्वत: कृष्णवर्णीय असतानाही त्यांच्याच देशात कृष्णवर्णियांवर अतोनात अत्याचार होत आहेत. त्यांनी हे अत्याचार आधी थांबवावे. भारताला सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, असा चिमटा जैन यांनी काढला.
ओबामांवर ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचा प्रभाव आहे. चर्चच्याच पाठिंब्यावर ते राजकारण करताहेत. ते त्यांच्या हातातील बाहुले आहेत. अमेरिका नेहमीच ख्रिश्‍चनांची चिंता करीत असते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविषयी ते कधीच बोलले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20377

Posted by on Feb 8 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2101 of 2453 articles)


=३२७.८८ अब्ज डॉलर्सच्या घरात= मुंबई, [७ फेब्रुवारी] - केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने विदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित ...

×