Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » ओमप्रकाश चौटालांना पुन्हा अटक

ओमप्रकाश चौटालांना पुन्हा अटक

=जमानतदाराने हमी मागे घेतली=
omprakash chautalaनवी दिल्ली, [२१ मार्च] – हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले आणि सध्या जामिनावर बाहेर आलेले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या जमानतदाराने हमीपत्र परत घेतल्याने चौटाला यांना आज सोमवारी पुन्हा एकदा अटक करण्यात आली.
चौटाला यांना जामीन मिळावा, यासाठी सुरजित सिंग नावाच्या वक्तीने हमीपत्र सादर केले होते. आज त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जाऊन हमीपत्र मागे घेण्याची परवानगी मागितली. न्या. संजय गर्ग यांनी ती मान्य केल्याने चौटाला यांचा जामीन आपोआपच रद्द झाला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून चौटाला यांना लगेच अटक करण्यात आली. यावेळी ८१ वर्षीय चौटाला न्यायालयीन कक्षातच उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27502

Posted by on Mar 22 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (597 of 2452 articles)


=काळ्या पैशावर इटलीतील तज्ज्ञांची माहिती= नवी दिल्ली, [२१ मार्च] - विदेशी बँकांमध्ये लपवून ठेवण्यात आलेला भारतीयांचा काळा पैसा देशात परत ...

×