Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ओवैसीची जीभ कापणार्‍यास बक्षीस देण्याची घोषणा

ओवैसीची जीभ कापणार्‍यास बक्षीस देण्याची घोषणा

Hyderabad MP Asaduddin Owaisiलखनौ, [१६ मार्च] – ‘माझ्या मानेवर कुणी सुरी जरी ठेवली तरीही मी भारतमाता की जय म्हणणार नाही’ असे वक्तव्य मुंबईतील एका सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केल्यावर याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. यानंतर ओवैसी यांची जीभ कापणार्‍यास २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा मेरठ येथील एका विद्यार्थी नेत्याने केली आहे.
दुष्यंत तोमर असे घोषणा करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव असून, तो एका महाविद्यालयातील संघटनेचा माजी अध्यक्ष आहे. ओवैसीच्या पुतळ्याचे मेरठ शहरात मंगळवारी दहन करण्यात आले त्यावेळी हे बक्षीस त्याने जाहीर केले आहे. ओवैसी यांचे वक्तव्य केवळ भारतविरोधीच आहे असे नव्हे, तर ते देशभक्त नसल्याचेच त्यांच्या विधानावरून दिसून येत असल्याचे तोमरने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27365

Posted by on Mar 17 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (642 of 2452 articles)


दुबई, [१६ मार्च] - युरोपातून भारतात समुद्र मार्गाने प्रवास करणारा पहिला युरोपियन वास्को द गामाचं समुद्रात बुडालेलं जहाज अखेर सापडलं ...

×