Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » औरंगजेब मार्ग नामांतरण याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

औरंगजेब मार्ग नामांतरण याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

delhi high-courtनवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – राजधानी दिल्लीतील औरंगजेब मार्गाचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम, असे नामकरण करण्याच्या दिल्ली महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने आज बुधवारी स्पष्टपणे नकार दिला.
आम्ही या प्रकरणी अभ्यास केला आहे. तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले, त्याचा जनहिताशी काहीही संबंध नाही. या नामांतराला कदाचित तुमचा आक्षेप असू शकतो. पण, नागरिकांनी कोणताही आक्षेप नोंदविला नाही, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
औरंगजेब मार्गाचे नाव बदलविण्याचा दिल्ली महापालिकेचा निर्णय हा जातीय राजकारणाचा भाग असून, इतिहासाचा अभ्यास नसल्यानेच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता, असा आक्षेपाचा मुद्दा याचिकाकर्ता वकील शाहिद अलीने उपस्थित केला होता. मात्र, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला. महापालिकेच्या या निर्णयाला विरोध करणार्‍या अनेक याचिका दाखल झाल्या. या सर्वांनीच महापालिकेवर जातीयतेचे राजकारण करीत असल्याचा आरोप ठेवला. पण, त्यात तथ्य नाही. दोन्ही बाजूंचे मत ऐकून घेतल्यानंतर न्या. रोहिणी म्हणाल्या की, काही लोक व्यक्तिगत हितासाठी या निर्णयाला विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे. नामांतराला जर जनसामान्यांचा विरोध असता, तर आतापर्यंत त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले असते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25131

Posted by on Oct 15 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1337 of 2452 articles)


=एसीबीने बजावली नोटीस= नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] - कांदा घोटाळा करून गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचा ऐन ...

×