Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » औरंगाबादमधील मानसीच्या मारेकर्‍याला अखेर फाशी

औरंगाबादमधील मानसीच्या मारेकर्‍याला अखेर फाशी

High Court, Aurangabadऔरंगाबाद, [८ मार्च] – राज्यात गाजलेल्या येथील मानसी देशपांडे हत्येप्रकरणी जावेद खान उर्फ टिंगर्‍याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने जावेदला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र औरंगाबाद हायकोर्टाने सत्र न्यायालयाच्याही पुढे जात जावेदला फाशीची शिक्षा सुनावली.
असे होत प्रकरण
११ जून २००९ रोजी १९ वर्षीय मानसी देशपांडे या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. रात्री चोरीच्या हेतूने घरात घुसलेल्या जावेद उर्फ टिगर्‍याने मानसीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी टिंगर्‍याला तब्बल दीड महिन्यांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी टिंगर्‍याची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टही केली होती.
टिंगर्‍याने कमी शिक्षा व्हावी म्हणून सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र राज्य सरकारने टिंगर्‍याला फाशी मिळावी म्हणून स्थानिक हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने या कृत्याची गंभीर दखल घेत जन्मठेपेची शिक्षा फाशीत बदलली. हायकोर्टाच्या या निर्णयाने अघेर मानसीला न्याय मिळाल्याची चर्चा येथे आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27133

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (728 of 2451 articles)


=राष्ट्रपतींचे मत, १५ महिला, सात संस्थांना नारी शक्ती पुरस्कार= नवी दिल्ली, [८ मार्च] - महिलांची मानसिकता सक्षम असायलाच हवी, असे ...

×