Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ‘कँडी क्रश’ मुळे अंगठयावर शस्त्रक्रिया

‘कँडी क्रश’ मुळे अंगठयावर शस्त्रक्रिया

candy-crush-saga-mobile-appकॅलिफोर्निया, [१६ एप्रिल] – मोबाईलवर असलेला कँडी क्रश सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. आपल्यापैकी बरेच जण वेळ मिळताचा किंवा वेळ काढून मोबाईलवर गेम खेळत बसतात किंवा चॅटींग तरी करत असतात. मात्र याचा अतिवापर झाल्यामुळे एका २९ वर्षीय युवकाच्या अंगठ्याची पेशी तुटल्याने अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील एका तरुणाला कॅण्डी क्रश खेळण्याची सवय लागली होती. दिवसभर आपली रोजची कामे तो उजव्या हाताने करायचा आणि डाव्या हाताने गेम खेळत राहायचा. काही दिवसांनी त्याला आपला अंगठा हलवतानांही त्रास होऊ लागला. तेव्हा तो उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या अंगठ्याचे ‘एमआयआर’ केले असता दिवस – रात्र खेळण्यामुळे त्याच्या अंगठ्याच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावर उपाय म्हणून अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले आहे. गेम अतिप्रमाणात खेळण्याचे वेड अंगलट आल्याचे शेवटी या तरुणाच्या लक्षात आले.
संशोधकांच्या मते गेम खेळणे एखाद्या व्यसनाप्रमाणे असते. त्यामध्ये आपण ऐवढे व्यस्त होतो की दुखनं विसरून जातो. डॉक्टरांच्या मते अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनवर गेम्स खेळणं हे हानिकारक ठरू शकतं.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22122

Posted by on Apr 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1785 of 2458 articles)


थाई एअरवेजच्या विमानाने आगमन सोनिया, प्रियंकाने घेतली भेट कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान आतषबाजीने केले स्वागत = नवी दिल्ली, [१६ ...

×