Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कंत्राटी कामगारांना किमान वेतन १० हजार

कंत्राटी कामगारांना किमान वेतन १० हजार

=प्रशासकीय आदेश लवकरच : दत्तात्रेय=
bandaru dattatreyaहैदराबाद, [१७ एप्रिल] – कंत्राटी कामगारांना मासिक दहा हजार रुपये वेतन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, याबाबतचा प्रशासकीय आदेश सरकार लवकरच जारी करणार आहे, अशी माहिती केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आज रविवारी येथे दिली.
श्रम कायद्यात सुधारण करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतन १० हजार रुपये मिळावे, यावरही सरकारचा निर्णय झाला आहे. संसदेतच हा मुद्दा निकाली निघाला असता, पण विरोधकांनी सरकारला सहकार्य केले नाही. आता मात्र सरकार याबाबतचा प्रशासकीय आदेश जारी करणार आहे, असे दत्तात्रेय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. विरोधकांच्या असहकार धोरणामुळे या अधिवेशनात श्रम कायद्यातील सुधारणांसह अन्य महत्त्वाचे विधेयक पारित होण्याची शक्यता कमी आहे. कंत्राटी कामगारांबाबत असलेल्या केंद्रीय कायद्यातील नियम २५ मध्ये सुधारणा केल्यानंतर देशभरातील कंत्राटी कामगारांना मासिक दहा हजार रुपये वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्राच्या प्रशासकीय आदेशाचे पालन सर्वच राज्यांना करणे भाग आहे, असे सांगताना दत्तात्रेय म्हणाले की, वाढती महागाई आणि महागाई भत्त्यातील विषमता लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत आवश्यक ते निर्देश सरकारला दिले होते. या आदेशाचे आम्ही पालन करणार आहोत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27850

Posted by on Apr 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (482 of 2453 articles)


=जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती= वॉशिंग्टन, [१७ एप्रिल] - चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या अधोगतीमुळे अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांनी तसेच जगभरातील बँकांनी ...

×