Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » कन्हैयाकुमारला सुरक्षा द्या : गुलाम नबी

कन्हैयाकुमारला सुरक्षा द्या : गुलाम नबी

Ghulam-Nabi-Azadनवी दिल्ली, [८ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारच्या जिवाला असल्याचा धोक्याचा मुद्दा आज मंगळवारी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. कन्हैयाला पुरेशी सुरक्षा देण्यात आल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करताना म्हणाले की, पूर्वाचल सेनेचा अध्यक्ष आदर्श शर्मा याने कन्हैयाचे शिर कलम करणार्‍याला ११ लाखांचे, तर भाजयुमोच्या कुलदीप वार्ष्णेय याने जिभ कापणार्‍याला ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. कन्हैयाच्या जिवाला गंभीर धोका असल्यामुळे त्याला सुरक्षा देण्याची मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.
आधी बनावट व्हीडिओच्या आधारे कन्हैयाला बदनाम करण्यात आले, नंतर त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप करीत आझाद म्हणाले की, आता त्याला जामीन मिळाला, तर जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. कन्हैयाचा बनावट व्हीडिओ तयार करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही आझाद यांनी केली.
कन्हैयाला पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे स्पष्ट करीत संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, वार्ष्णेयविरुद्ध पक्षाने कारवाई केली असून, कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. बनावट व्हीडिओचीही चौकशी केली जाणार असल्याचे नकवी यांनी म्हणाले. कन्हैयाविरुद्धच्या बनावाट व्हीडिओची चौकशी करण्याची सूचना उपाध्यक्ष कुरियन यांनी केली होती.
अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा मुद्दाही आझाद यांनी उपस्थित केला. आपल्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तनाची तक्रार अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष ऋचासिंह यांनी सर्व खासदारांना पत्रातून केली असल्याचे जदयुचे के. सी. त्यागी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27120

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (732 of 2452 articles)


=मोन्सेराट पॅनेलला स्पष्ट बहुमत= पणजी, [८ मार्च] - गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला पणजी या राजधानीच्या शहरातील महानगर पालिकेची सत्ता गमवावी ...

×