Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » कन्हैयाकुमारविरुद्ध पुन्हा पत्रकं

कन्हैयाकुमारविरुद्ध पुन्हा पत्रकं

=गोळ्या घालण्याची धमकी=
kanhaiya-kumarनवी दिल्ली, [११ मार्च] – देशद्रोहाच्या घोषणा दिल्याच्या आरोपात अटक झालेला आणि नंतर जामिनावर सुटलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारविरुद्ध अजूनही जनमानसात प्रचंड आक्रोश असल्याचे दिसत आहे. राजधानीतील जंतरमंतर परिसरात आज पुन्हा कन्हैयाकुमारला मारण्याबाबतची पत्रक आढळून आली.
बलबीरसिंह असे नाव असलेल्या आणि स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणविणार्‍या व्यक्तीने ही पत्रकं लावली आहेत. जेएनयुतील देशद्रोह्यांना गोळ्या घालणे हा राष्ट्रधर्म आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य आणि कन्हैयाकुमारला मी गोळ्या घालीन, असे बलबीरने या पत्रकात म्हटले आहे. देशाला शिव्या देणार्‍या, देशद्रोहाच्या घोषणा देणार्‍या आणि अफजल गुरूच्या शहीद दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार्‍या सर्वांना मी गोळ्या घालीन, अशा इशाराही बलबीरने या पत्रकातून दिला आहे.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वांत मोठे देशद्रोही असल्याचा उल्लेख करीत देशद्रोह्यांना गोळ्या घालणे हे पुण्याचे काम असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. देशाला खरा धोका अतिरेक्यांपासून नाही, तर देशद्रोहाच्या घोषणा देणार्‍यांपासून आहे. त्यामुळे अशा देशद्रोह्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे.
या पत्रकांवर पोलिसांनी काय कारवाई केली ते समजू शकले नाही. कन्हैयाकुमारला पोलिसांनी पूर्ण संरक्षण दिले असून, त्याच्या सर्व हालचालींची माहिती देण्याची विनंती पोलिसांनी जेएनयू प्रशासनाला केली आहे, जेणेकरून तो जिथे जाईल, तिथे त्याला पोलिस संरक्षण देता येईल.
याआधीही राजधानीतील प्रेस क्लब परिसरात लावण्यात आलेल्या पत्रकातून कन्हैयाला जिवे मारणार्‍याला तसेच त्याची जीभ कापणार्‍याला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी जेएनयूच्या परिसरात एका व्यक्तीने कन्हैयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27244

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (687 of 2452 articles)


=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेचे आवाहन= नागौर, [११ मार्च] - शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी ...

×