Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » कमलनाथ यांची नियुक्ती शिखांचा अपमान : बादल

कमलनाथ यांची नियुक्ती शिखांचा अपमान : बादल

Punjab CM Badalचंदीगड, [१३ जून] – ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी सरचिटणीस म्हणून करण्यात आलेली नियुक्ती हा शिखांचा घोर अपमान आहे, या शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांच्या कथित सहभागाच्या मुद्यावरून आम आदमी पार्टीनेही कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
कमलनाथ यांची नियुक्ती करून कॉंग्रेसने असंवेदनशीलतेचा कळस गाठला असून, नोव्हेंबर १९८४ मध्ये हजारो निष्पाप शीख मुले, पुरुष आणि महिलांची कॉंग्रेसच्या गुंडांनी जी कत्तल केली त्याप्रकरणी जे राष्ट्रीय जनमत आहे त्याचाही हा अपमान आहे, असे प्रकाशसिंग बादल यांनी म्हटले आहे. शिखांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी कॉंग्रेस हायकमांड एवढी खालची पातळी गाठू शकते हे बघून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला, असेही बादल पुढे म्हणाले.
दरम्यान, प्रख्यात विधिज्ञ व आपचे नेते एच. एस. फुल्का यांनीही कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर टीका केली. फुल्का दंगल पीडितांसाठी लढा देत आहेत, हे विशेष. शीखविरोधी दंगलीदरम्यान कमलनाथ यांनी रकिबगंज साहिबवर हल्ला करणार्‍या जमावाचे नेतृत्व करत होते, असे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्राने २ नोव्हेंबर १९८४ रोजी दिले होते, तर ३ नोव्हेंबर रोजी आणखी एका वृत्तपत्राने अशीच बातमी दिली होती. त्यामुळे दंगल पीडितांच्या भावनांची आपल्याला मुळीच पर्वा नाही हाच संदेश देऊन कॉंग्रेस जखमांवर मीठ चोळत आहे, असे फुल्का यांनी याबाबत बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28578

Posted by on Jun 13 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (242 of 2452 articles)


=सिप्रीचा अहवाल= लंडन, [१३ जून] - पाच मिनिटांत भारतावर अणुहल्ला करण्यास पाकिस्तान सक्षम आहे, असा दावा अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान ...

×