Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कमी अंतराचा रेल्वे प्रवास महागला

कमी अंतराचा रेल्वे प्रवास महागला

=शुक्रवारपासून अंमलबजावणी=
Railways-hike-fares-across-all-classes-by-20-percent.नवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] – कमी अंतराचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना रेल्वेने आज मंगळवारी धक्का दिला. कमी अंतरासाठी आतापर्यंत किमान पाच रुपये असलेले प्रवास भाडे आता १० रुपये करण्यात येत असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली. येत्या २० नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
केवळ जनरल डब्यातील तिकिटासाठीच ही दरवाढ राहणार असून, उपनगरीय सेवा देणार्‍या गाड्यांमध्ये ती लागू होणार नाही, असे रेल्वे प्रवक्त्याने स्पष्ट केले. लोकलच्या दरावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
प्लॅटफार्म तिकिटासाठी आता सरसकट १० रुपये मोजावे लागत असल्याने रेल्वेच्या कमी अंतरावरील किमान प्रवास भाडेही १० रुपयेच असावे, या धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रवक्ता म्हणाला. या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्लॅटफार्म तिकिटाची किंमत १० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, हे विशेष.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25512

Posted by on Nov 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1224 of 2453 articles)


पाटणा, [१७ नोव्हेंबर] - भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यासारख्या नेत्यांना ...

×